संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही; आनंद परांजपे

महाराष्ट्र राजकीय

संजय राऊत भारत -पाक क्रिकेटला विरोध करायचाच असेल तर पहिल्यांदा एमसीए सदस्य आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा घ्या..

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांनी अजितदादा पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टिका करणार्‍या संजय राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊतसारख्या बिनडोक माणसाकडून अजितदादा पवार यांना देशप्रेमाची… देशभक्तीच्या कुठल्याही सर्टीफिकेटची गरज नाही असा स्पष्ट इशारा आनंद परांजपे यांनी दिला.

शिवसेना उबाठाच्या रॅलीमध्ये… विजयोत्सवामध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले याचे उत्तर संजय राऊत यांनी संपूर्ण महाराष्ट्राला पहिल्यांदा द्यावे असे खडेबोल सुनावतानाच आजच्या भारत – पाकिस्तान सामन्याचा विरोधच करायचा असेल तर पहिल्यांदा मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये (एमसीए) सदस्य असलेले शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा पहिल्यांदा घ्यावा असे थेट आव्हानच आनंद परांजपे यांनी दिले.