…तोपर्यंत छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही

महाराष्ट्र

राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी

संभाजीनगर: राज्य सरकारने औरंगाबाद आणि ऊस्मानाबाद या दोन शहरांचे नामांतर केल्यानंतर आता मुंबई हायकोर्टामध्ये नामांतरासंदर्भात याचिकेवर सुनावणी झाली आहे. यावेळी कोर्टाच्या अंतिम सुनावणीवर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाहीत, अशी आशा कोर्टाने व्यक्त केल्यानंतर औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नसल्याची हमी राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे.

राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराच्या नामांतराचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात नामांतराविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील अंतिम सुनावणी अजून झाली नाही. जोपर्यंत अंतिम सुनावणी होत नाही तोपर्यंत जुनीच नावे वापरण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर महा अधिव्यक्तांनी बदलेली नावे न वापरण्याचं स्पष्ट केलं असलं तरी कर्मचारी बदलेली नावे वापरात असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

तर काही खात्यांनी नावांमध्ये बदल केलाय मात्र ते बदल प्रशासनिक आहेत असं महाअधिवक्यांनी कोर्टाला सांगितलं आहे. महाअधिवक्ता यांनी याआधी भाष्य करून देखील कर्मचारी नवीन नाव वापरत असतील तर ती प्रशासनावरची कमजोरी असून त्यांच्यावर अवमानाची कारवाई करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी येणाऱ्या बुधवारी होणार आहे.