पोलीस भरतीसाठीची अशी असेल लेखी परीक्षा

महाराष्ट्र

पोलीस भरतीसाठी 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.

असा असेल गणित विषयाचा सिलॅबस…

संख्या व संख्याचे प्रकार बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर

वर्ग व वर्गमूळ घन व घनमूळ

शेकडेवारी कसोट्या

म. सा. वी आणि ल. सा. वी. पूर्णाक व त्याचे प्रकार

अपूर्णांक व त्याचे प्रकार भागीदारी

गुणोत्तर व प्रमाण सरासरी

दशमान पद्धती, नफा-तोटा

काळ, काम, वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज

घड्याळावर आधारित प्रश्न, घातांक व त्याचे नियम

गणित विषयांमध्ये एकूण पंचवीस प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यापैकी प्रत्येक प्रश्नाला एक मार्कांचं वेटेज असणार आहे. तसंच एकूण मार्कांमध्ये स्कोर करण्यासाठी गणित येणं खूप आवश्यक असणार आहे. त्यामुळे तुम्हालाही हे गणिताचं भूत उतरवायचं असेल तर सिलॅबसनुसार अभ्यास करणं आवश्यक आहे.

चालक पदांसाठी अशी होईल चाचणी

हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणांची असेल आणि जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणांची अशी एकूण 50 गुणांची कौशल्य चाचणी द्यावी लागेल.

दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.

कौशल्य चाचणी हो केवळ एक अहंता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.

कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.