कान्हूर मेसाई मध्ये पाण्याची गंभीर समस्या परंतु राजकीय नेत्यांची फक्त आश्वासन

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील कान्हूर मेसाई मध्ये पाण्याची गंभीर समस्या असताना कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने दीर्घकालीन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच ही शेकडो वर्षांची समस्या कायम आहे. पाण्याची समस्या कायम सुटेल असा आशावाद वाटू लागला होता. अनेकांची सत्ता आली आणि गेली मात्र, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी कोणीही सोडवू शकले नाही.

मध्यंतरीच्या काळात पाटच्या पाण्याच्या जलवाहिनीद्वारे कान्हूर गावामध्ये पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ती पाईपलाईन इतकी सदोष होती की वारंवार त्या पाईपलाईन मध्ये समस्या निर्माण होऊन जलसंकट गडद होत होते. आजही कान्हूर गावामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती आहे. दुष्काळग्रस्त गावांनी मोर्चे आंदोलने करुन सुद्धा पाणी प्रश्न सुटला नाही. याकडे कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांची लक्ष नाही. त्यांची अनास्था कायम आहे.

यावर्षी एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे. सध्या संपूर्ण गटामध्ये निवडणुकीचे जोरदार चर्चा असताना जनतेमध्ये मात्र संतप्त भावना असून पहिल्यांदा आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवा व नंतरच आमच्याकडे मते मागायला या, असे पाबळ, कान्हूर मेसाई , केंदूर, चिंचोली मोराची, मिडगूलवाडी या गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून चर्चा होत आहे.

त्यामुळे मतदार राजांनी पण आता जागे झाले पाहिजे आंदोलन व मोर्चे करून पण राजकीय नेते गप्प आहे. या निवडणुकीत पाणी प्रश्न मार्गी लागला तरच दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळू शकते .