ncp - shivsena

शिवनसेनेचे डॉ. सुभाष पोकळे राष्ट्रवादीत जाणार का?

राजकीय

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे राष्ट्रवादीत जाणार का? या विषयीच्या चर्चेला बेट भागात उधान आले आहे.

बेट भागात राष्ट्रवादी पक्षात गावडे व घोडे असे परस्परविरोधी दोन गट तयार झाले आहेत. दोन्हीही जिल्हा परीषद सदस्य पदाची निवडणुक लढवण्यासाठी सज्ज झाल्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला दयायची हा पक्षश्रेष्टींकडे मोठा पेच तयार झाला आहे. त्यातच दामु घोडे यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायतीसह इतर ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवल्याने राष्ट्रवादी पक्षाकडून ते जिल्हा परीषदेसाठी उमेदवार म्हणुन प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ…
राष्ट्रवादीतील पुर्वाश्रमीचे डॉ. सुभाष पोकळे हे तिकीट न मिळाल्याने शिवसेनेत गेले व तेथे पंचायत समिती सदस्य म्हणून शिवसेनेकडून एकमेव सदस्य म्हणून निवडूण आले होते. दोघांच्या भांडणात डॉ. पोकळे राष्ट्रवादीत गेल्या वर पक्षश्रेष्ठी त्यांना तिकीट देणार का? त्यांना तिकीट दिल्यावर नाराज झालेले घोडे व गावडे गट काय भुमिका घेणार? या विषयीच्या चर्चा बेट भागातील गावोगावी होत असून असे झाल्यास शिवसेनेकडून गणेश जामदार हे निवडणुक लढवणार आहेत. शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे हेही जिल्हा परीषद उमेदवार म्हणून जोरदार प्रचार करत आहेत. तसेच भाजपाचे सावित्रा थोरात काय भुमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

डॉ. पोकळे हे राष्ट्रवादीत जाणार असून त्याबाबत चाचपणी चालू असून गुप्त बैठका वर बैठका सुरु असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली. या विषयी त्यांच्याशी संपर्क साधला असता असे काही होणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.