bjp-ncp

शिरुर तालुक्यात आता ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची ‘टिकटिक’ सुरुच राहणार?

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (अरुणकुमार मोटे): सध्या शिरुर तालुक्यात घोडगंगा साखर कारखाना, शिरूर नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच काही ग्रामपंचायत अशा विविध प्रकारच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात नुकतेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळून भाजप व शिंदे समर्थकांचे सरकार स्थापण झाले आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे कार्येकर्ते मोठया जोमाने घोडगंगा सहकारी कारखान्याच्या रिंगणात उतरले आहेत.

गेले अनेक दिवस आजारी असलेले माजी आमदार बाबुराव पाचर्णे, दादा पाटील फराटे, पाडूरंग आण्णा थोरात यांनी महाराष्ट्रात सत्ता आल्यावर लगेच घोडगंगा साखर कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असुन तालुक्यातील महत्त्वाची सहकारी संस्था म्हणून ‘घोडगंगा’ ओळखला जातो. या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु आहे. कारखाना आर्थिक अडचणीत असताना गेली दोन वर्षे सातत्याने शिरुर-हवेलीचे आमदार तसेच कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात असुन राज्यात पुन्हा सत्ता बदल झाला असल्याने त्याचे पडसाद थेट शिरुर तालुक्यात उमटत आहेत.

शिरुर तालुक्याच्या पूर्व भागात भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. राष्ट्रवादीचे आमदार पवार यांच्यावर नाराजीचा असलेला सूर, साखर कारखाना अडचणीत असतानाही घेतलेले निर्णय, कामगारांचे थकीत पगार असे अनेक महत्त्वाचे मुद्दे यावर विरोधक आमदार पवार यांना लक्ष्य करत होते. त्यामुळे राज्यातील सत्ताबदलाचा परिणाम या निवडणुकीवर होणार असल्याचे बोलले जात आहे.

unique international school
unique international school

याविषयी बोलताना भाजपचे माजी तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी सांगितले की, केंद्रीय सहकार मंत्री व गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यावर सत्ता आली तर कारखाना निश्चित अडचणीतून बाहेर पडेल. तसेच बेट भागात भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार सावित्रा थोरात म्हणाले, महाराष्ट्रात सत्ता आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्ते सध्या जोमाने प्रचार करु लागले आहेत. एकुणच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यात भाजपची सत्ता आल्याने शिरुर तालुक्यात राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून शिवसेनेचा त्यांना छुपा पाठींबा असणार आहे.