Shikrapur Grampanchayat

शिक्रापूर ग्रामपंचायत इमारत ठरतेय तिरंग्याने लक्षवेधक…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत इमारत पुणे-नगर महामार्गावरील शिरुर तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी इमारत आहे.

देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. शिक्रापूर ग्रामपंचायत इमारतीवर ध्वजारोहण करत आकर्षक तिरंगा रंगातील विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तीन मजली इमारत असलेल्या या इमारतीला केशरी पंधरा हिरवा असा तिरंगा रंगात करण्यात आलेली विद्युत रोषणाई महामार्गावरील प्रमुख आकर्षण ठरत आहे. सायंकाळच्या सुमारास नागरिक सदर ठिकाणी विद्युत रोषणाई पाहण्यासाठी गर्दी करत आहे.

दरम्यान, शिक्रापूर ग्रामपंचायत इमारत तिरंग्याने लक्षवेधक ठरत असून, संबंधित छायाचित्र सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.