रांजणगाव गणपती येथे तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा उत्साहात

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातून ५५९ विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): बाल रंगभूमी परिषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित नट श्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती तालुकास्तरीय नाट्यछटा स्पर्धा प्राथमिक फेरी श्री महागणपती ग्रुप ऑफ स्कूल रांजणगाव गणपती केंद्रावर रविवारी (ता. ६) उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये शिरूर तालुक्यातील रांजणगाव केंद्रातील एकूण २९ शाळांमधून ४०२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. शिरूर केंद्रावर सहा शाळांमधून १५७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धांचे माध्यमातून उद्याचे कलाकार तयार होतील, असे लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी म्हटले आहे.

स्पर्धेवेळी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची यावेळी विशेष उपस्थिती लाभली होती. रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांचे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. डॉ. विकास शिवाजी शेळके यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. रासपचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शिरूर शाखेचे कोषाध्यक्ष बाळासाहेब शेळके यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, सभाधिटपणा रुजावा, प्रेक्षकांसमोर उभे राहून बोलण्याचे धाडस निर्माण व्हावे, यासाठी नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विकास शेळके यांनी सांगितले.

बाल रंगभूमी पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा दिपाली शेळके यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, ‘प्रत्येकामध्ये काहीतरी गुण दडलेले असतात. पण, गुणांना वाव देण्यासाठी एका व्यासपिठाची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या गुणांना वाव देण्यासाठी बाल रंगभूमी परिषद पुणे जिल्ह्याने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठाचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी गोंधळलेली परिस्थिती निर्माण होते. त्या वेळेला ताल, तोल आणि लय सांभाळण्याचे सामर्थ आपल्याला कला देते. यामुळे प्रत्येकाने कलेशी मैत्री करावी. या स्पर्धांच्या माध्यमातूनच उद्याच्या बाल रंगभूमीचे कलाकार आणि प्रेक्षक तयार होतील.’

सुरेखा पुणेकर म्हणाल्या, ‘शाळांमध्ये होत असलेल्या स्पर्धांमधूनच उद्याचे कलाकार तयार होत असतात. माझे शिक्षण झाले नसताना देखील कलेच्या माध्यमातून मी सातासमुद्रापार जाऊ शकले. स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा मोठी भरारी घेऊ शकता.’ दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव सुरेखा पुणेकर यांनी ‘या रावजी, बसा भावजी…’ ही लावणी म्हटली.

प्राथमिक फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धेमध्ये आपली नाट्यछटा सादर करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती केंद्रप्रमुख वैशाली पोतदार यांनी दिली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री महागणपती ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अरविंद गोळे, महागणपती इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपप्राचार्य अबेदा अत्तार, अक्षरनंदन गुरुकुल स्कूल प्राचार्या वंदना खेडकर, श्री महागणपती ग्लोबल स्कूल प्राचार्या पद्मिनी कवठेकर, विभागप्रमुख सोनाली नलावडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख शेहनाज शेख, विभा कळसकर तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष प्रयत्न केले.

परीक्षक म्हणून सिने आणि नाट्य क्षेत्रातील दिलीप हल्याळ, बाल रंगभूमी प्रमुख कार्यवाह देवेंद्र भिडे, उपाध्यक्ष अरुण पटवर्धन, कोशाध्यक्ष संत्यम कोठावदे, महेश टिळेकर, रवींद्र देवधर, अभिजीत इनामदार, डॉ सोनाली घाटणेकर, नितीन महाजन, प्रदीप देवकर, प्रिया नेर्लेकर, मंजुषा जोशी, शंकर घोरपडे, संजीव मांढरे, मनोज नाईकवाडी, प्रदीप तुंगारे यांनी काम पाहिले. बाल रंगभूमी पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष दिपक रेगे, उपाध्यक्ष नारायण कर्पे यांनी केंद्राचे आणि सहभागी स्पर्धकांचे विशेष कौतुक केले. डीआरए मल्टीइनोव्हेशन प्रा. लि. आणि रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांचे विशेष सहकार्य लाभले. सोनाली नलावडे यांनी सूत्रसंचालन केले तर अरविंद गोळे यांनी आभार मानले.

सहभागी झालेल्या शाळांची नावे पुढीलप्रमाणेः

१. आर बी गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे

२. व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर.

३. विद्या विकास मंदिर करंदी.

४. तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी.

५. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी.

६. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर.

७. तक्षशिला गुरुकुल पब्लिक स्कूल शिक्रापूर.

८.आर एम डी इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर.

९. श्री महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल ,रांजणगाव गणपती

१०. अक्षरनंदन गुरुकुल स्कूल, रांजणगाव गणपती.

११. श्री महागणपती ग्लोबल स्कूल, रांजणगाव गणपती.

१२. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे कुंभार.

१३. गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव.

१४. विद्याधाम प्रशाला शिक्रापूर.

१५. विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी.

१६. आर एम डी विद्यानिकेतन प्रशाला कोंढापुरी.

१७. श्रीमती बबईबाई टाकळकर प्राथमिक आश्रम शाळा निमगाव म्हाळुंगी.

१८. श्रीमती बबईबाई टाकळकर माध्यमिक आश्रम शाळा निमगाव म्हाळुंगी.

१९. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढापुरी.

२०. शंकराव बाजीराव डावखरे विद्यालय हिवरे पिंपळे.

२१. जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल सणसवाडी.

२२. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 954 कोरेगाव पुनर्वसन.

२३. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कोरेगाव भीमा.

२४. भैरवनाथ विद्यामंदिर पाबळ.

२५. कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव.

२६. अक्षरनंदन गुरुकुल स्कूल कारेगाव.

२७. शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढू.

२८. विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई.

२९. जि. प. प्राथमिक शाळा तळेगाव ढमढेरे शाळा क्र. १

अंतिम फेरीसाठी पात्र झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणेः 

गट.क्र. – ०१

जिल्हा स्पर्धेसाठी निवड झालेले स्पर्धक

१. स्वरा संजय पोखरकर( महागणपती इंग्लिश मिडीयम स्कूल, रांजणगाव गणपती)

२. हितांशी संतोष इंदापूरकर( व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर)

३. आराध्या विकास जासूद( व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर)

४. गायत्री विशाल शेळके( महागणपती इंग्लिश म मिडियम स्कूल)

५. सानवी अतुल मोटे( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ९५४ कोरेगाव पुनर्वसन)

६. स्वरा देविदास गोरले( जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कोरेगाव भीमा)

उत्तेजनार्थ

१. स्पृहा ऋषिकेश यादव( कारेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल कारेगाव)

२. आराध्या अजित लांडे( श्री महागणपती ग्लोबल स्कूल, रांजणगाव गणपती)

३. भाग्येश नंदकुमार एडसकर( कारेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल कारेगाव)

४. आर्या सचिन धारकर( महागणपती इंग्लिश म मिडियम स्कूल)

गट.क्र. – ०२ 

जिल्हा स्पर्धेसाठी निवड झालेले स्पर्धक

१. नक्षत्रा निशाद पटवर्धन( आर. एम.धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर)

२. ओम भानदुर्गे( गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव)

३. जय नितीन जोशी( आर. एम.धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर)

४. मल्हार ऋषिकेश केंदळे( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी)

५. अंजली श्रीधर करकंडे( अक्षरनंदन गुरुकुल स्कूल कारेगाव)

६. अनुरा बिपिन मांढरे( श्री महागणपती ग्लोबल स्कूल, रांजणगाव गणपती)

७. आराध्या महेश सणसे( महागणपती इंग्लिश मिडीयम स्कूल, रांजणगाव गणपती)

८. सृष्टी प्रवीण बागल( व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर)

९. शर्वरी गणेश गव्हाणे( जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कोरेगाव भीमा)

१०. स्वराली सोमनाथ आढागळे( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे कुंभार)

उत्तेजनार्थ

१. स्मिताक्षी अमोल साळवे( व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर)

२. पार्थ दत्तात्रेय वानखेडे( महागणपती इंग्लिश मिडीयम स्कूल, रांजणगाव गणपती)

गट.क्र. ०३ 

जिल्हा स्पर्धेसाठी निवड झालेले स्पर्धक

१. मृणाल उमाकांत बिरादार( व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर)

२. कार्तिकी सचिन साबळे( श्री महागणपती ग्लोबल स्कूल स्कूल, रांजणगाव गणपती)

३. अजिंक्य महेश वानखेडे( महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल रांजणगाव गणपती)

४. आनंदी अमोल टोणगे( स्वा .से.आर.बी .गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे)

५. भक्ती संतोष खोत( स्वा .से.आर.बी .गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे)

६. अनुष्का बापूराव महामुनी( तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी)

७. इशिका ईश्वर डोमाले( कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव)

८. श्रावणी धनंजय सोनवणे( तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी)

९. अनुष्का तुकाराम जगताप( तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी)

१०. मनस्वी उमेश ढमढेरे( आर. एम.धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर)

११. अनुष्का संजय तंटक( आर. एम.धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर)

१२. साई सुनील वर्पे( विद्याधाम प्रशाला शिक्रापूर)

१३. आर्या संदीप चव्हाण( आर. एम.धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर)

१४. शरद प्रकाश दामोदर (अक्षरनंदन गुरुकुल स्कूल कारेगाव)

१५. वैष्णव दशरथ आढाव( विद्याधाम प्रशाला शिक्रापूर)

१६. उन्नती दीपक भोसले( श्रीमती बबई बाई टाकळकर प्राथमिक आश्रम शाळा)

उत्तेजनार्थ

१. धनश्री धीरज शिंदे( आर. बी. गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे)

२. श्रीशा दिलीप काळे( महागणपती इंग्लिश मिडीयम स्कूल, रांजणगाव गणपती)

३. स्नेहल दिलीप मस्के( आर. बी. गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे)

४. अथश्री मयूर फुलफगर( व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर)

५. सोहम शिंदे( श्रीमती बबई बाई टाकळकर प्राथमिक आश्रम शाळा)

६. तन्वी युवराज नरवडे( विद्या विकास मंदिर निमगाव)

७. वेदांती विकास वाखारे( आर. एम.धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर)

८. मनीष प्रताप खरपुडे ( विद्याधाम प्रशाला शिक्रापूर)

९. साई सुंदर कांबळे( विद्याधाम प्रशाला शिक्रापूर

गट. क्र. ०४

जिल्हा स्पर्धेसाठी निवड झालेले स्पर्धक

१. सृष्टी दत्तात्रय गायकवाड( महागणपती इंग्लिश मिडीयम स्कूल, रांजणगाव गणपती)

२. सिद्धी हेमंत भिसे( विद्याधाम प्रशाला शिक्रापूर)

३. मोक्षदा मंगेश घारगे( स्वा .से.आर.बी .गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे)

४. श्रावणी संजय गाडे( स्वा .से.आर.बी .गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे)

५. तृप्ती गणेश चौधरी( स्वा .से.आर.बी .गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे)

६. अंजली अरविंद गोळे( महागणपती इंग्लिश मिडीयम स्कूल, रांजणगाव गणपती)

७. पूजा गंगाधर भंडारे (शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढू)

८. तनिष्का शैलेश कासार( डावखरे विद्यालय)

९. मोहिनी शहाजी घारे (विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई)

१०. हर्षदा विठ्ठल राऊत (डावखरे विद्यालय)

११. सिद्धेश आबाजी संकपाळ (विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई)

उत्तेजनार्थ

१. श्रुती लक्ष्मण देवकर( व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर)

२. भार्गवी रमेश धुमाळ ( व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर)

३. तनिष्का संदीप पवार ( विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंदी)

४. इशिका शेखर जगताप ( व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर)

५.आर्यन संपत होळकर ( व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर)

६. पायल विधाटे ( विद्या विकास निमगाव म्हाळुंगी)

७. तेजश्री नथ्थू पाटील( शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय वढू)

८. सिद्धी निलेश भवर( डावखरे विद्यालय)

९. आयुष शरद धायबर( डावखरे विद्यालय)

अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण कार्यक्रम 

स्पर्धा अंतिम फेरी – शहर विभाग

दिनांक – रविवार, १३ ऑगस्ट २०२३

वेळ – सकाळी ९.३० वाजता

स्पर्धा अंतिम फेरी ग्रामीण विभाग सकाळी १०.३० वाजता

स्थळ – पेरुगेट भावे हायस्कूल, पुणे.

रिपोर्टींग वेळ – सकाळी ९.१५

बक्षीस वितरण – 

दिनांक – रविवार, १३ ऑगस्ट २०२३

वेळ – सायंकाळी ४ वाजता

स्थळ – पेरुगेट भावे हायस्कूल, पुणे.