शिरुरमध्ये रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पुरस्कार वितरण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर येथील रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्त शिरुर तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलिस निरीक्षक संजय जगताप, भुमी अभिलेख अभिलेखचे अमोल भोसले, नामदेव घावटे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरुर रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्य हे नेहमीच उत्कृष्ट आहे. हि संस्था नेहमी समाजपयोगी काम करत असते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त शिरुर तालुक्यातील प्रशासकीय तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी कर्तव्यदक्ष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यामध्ये शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलिस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, संदीप यादव पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, अभिजित पवार, सुनील उगले, विक्रम जाधव, स्नेहल चरापले, सुजाता पाटील गोपनीय अंमलदार राजेंद्र गोपाळे, तहसीलचे पुरवठा निरीक्षक निलेश घोडके, तहसील कर्मचारी संकेत दळवी या सर्वांना कर्तव्यदक्ष पुरस्कार तर निर्भिड पत्रकार पुरस्कार अभिजित आंबेकर, समाजभूषण पुरस्कार डॉ सोनल भालेकर, जनसेविका सरपंच पुरस्कार विमलताई नानेकर, कर्तव्यदक्ष पोलिस पाटील पुरस्कार प्रतिभा गिरमकर, शिरुर ग्रामीणचे ग्रामसेवक पी सी केदारी, कर्मचारी नारायण गायकवाड यांनाही यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

यावेळी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांच्या वतीने सन्मानचिन्ह तसेच झाड देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी महिला दक्षता समितीच्या जिल्हा सदस्या शोभना पाचंगे, पत्रकार किरण पिंगळे, डॉ वैशाली साखरे, उद्योजिका सविता बोरुडे, राणी शिंदे, छाया हारदे, ललिता पोळ, शेख आदी उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी शिरुर ग्रुप विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक शरद पवार आणि “शिरुर तालुका डॉट कॉम” च्या उपसंपादिका किरण पिंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.