टाकळी हाजीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह  

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावातील सार्वजनिक स्मशानभूमीत एक अनोळखी व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला असून, याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेचा तपशील धोंडीभाऊ भानुदास गावडे (वय ५४), व्यवसाय शेती, रा. टाकळी हाजी हे गावातील शांताबाई भागा खटाटे (वय ८५) यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेले असता, त्यांनी नदीच्या घाटाच्या पायरीवर एक अनोळखी इसम हालचाल न करता पडलेला पाहिला. त्यांनी त्वरित पोलीसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली, मात्र सदर व्यक्तीची ओळख पटली नाही. त्यानंतर खाजगी अॅम्बुलन्सद्वारे मृतदेह ग्रामीण रुग्णालय, शिरूर येथे पाठवण्यात आला, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अनैसर्गिक मृत्यूची नोंद…

या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण समजू शकेल.

मयत व्यक्तीचे वर्णन

वय: अंदाजे २८ ते ३० वर्षे

लिंग: पुरुष,

केस: काळे,

दाढी: काळी, वाढलेली,

वर्ण: सावळा-काळसर,

शारीरिक बांधा: मध्यम,वेशभूषा:

अंगात शर्ट व पँट

शिरूर पोलिसांकडून या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. जर कोणाला या इसमाविषयी काही माहिती असेल किंवा त्यांच्या कुटुंबीयांचा शोध लागल्यास, त्वरित खालील क्रमांकावर संपर्क साधावा:

शिरूर पोलीस ठाणे – ☎ ८८८८८६१४९८