शिरूर पोलिसांचा तपास सुरू
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील फाकटे गावातून दर्शन उमाजी गायकवाड (वय १५) हा १९ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजता गायकवाड वस्ती येथील घरासमोरून बेपत्ता झाला आहे. मुलाचे वडील उमाजी चंद्र गायकवाड यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, कोणीतरी फुस लावून मुलाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला आहे.
अपहारीत मुलाचा वर्णन
नाव: दर्शन उमाजी गायकवाड
वय: १५ वर्षे
रंग: गोरा
नाक: मरळ
चेहरा: गोल
केस: काळे, बारीक
शरीर बांधा: सडपातळ
उंची: साडेचार फूट
वेशभूषा: लाल रंगाचा फूल बाह्याचा टी-शर्ट, निळ्या रंगाची पँट, पायात काळ्या रंगाचे बूट
भाषा: मराठी
ओळख: मिशी बारीक, दाढी नाही
शिक्षण: दहावी
पोलिस तपास आणि नागरिकांना आवाहन
शिरूर पोलिसांनी या घटनेची तक्रार दाखल करून गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास किंवा दर्शन उमाजी गायकवाड याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
तपास अधिकारी: दिपक करांडे, स.पो.नि, शिरूर पोलीस स्टेशन – ☎ ८८८८८६१४९८
मुलाचे वडील: उमाजी चंद्र गायकवाड – ☎ ९३२५८७५५२२
शिरूर पोलिस नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत. कोणत्याही ठिकाणी हा मुलगा आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.