गुरुंकडून मिळालेले ज्ञान खरी संस्कार शिदोरी: महेश ढमढेरे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): गुरुंकडून मिळणारी ज्ञानरुपी संस्कार शिदोरी हीच खरी यशाची गुरुकिल्ली असून मुलांनी आई वडिलांप्रमाणे शिक्षक व गुरुजनांचा आदर करावा, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश ढमढेरे यांनी केले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात शिक्षक दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या गुरुजन गौरव समारंभात बोलताना महेश ढमढेरे बोलत होते.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक नवले हे होते तर यावेळी प्रा. डॉ. पराग चौधरी, प्रा. मीनाक्षी पोकळे, प्रा. किशोर आढाव, प्रा. डॉ. संदीप सांगळे, डॉ. डी. सी. वाबळे, डॉ. अमेय काळे, प्रा. विष्णू गिरमकर, डॉ. विवेक खाबडे, प्रा. सुमेध गजबे, डॉ. पद्माकर गोरे, प्रा. अजिता भूमकर यांसह आदी उपस्थित होते, आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आजच्या बदल्यात जीवनशैलीत गुरुजनांमुळेच संस्कार आणि आदर्श टिकून आहेत. विद्यार्थ्यांनी गुरुंकडून शक्य तेवढे ज्ञान आत्मसात करून यशस्वी जीवनाचा पाया पक्का करावा तसेच शालेय जीवनात शिक्षकांविषयी प्रेम आणि आदरभाव रुजण्याची गरज आहे. आपल्या आई वडिलांप्रमाणेच शिक्षकांविषयी आदराची भावना ठेवली तर सुसंस्कृत आणि आदर्श समाज निर्माण व्हायला वेळ लागणार नाही असे देखील महेश ढमढेरे यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाच्या जीवनातील शिक्षण आणि शिक्षकाचे महत्त्व अधोरेखित करत गुणवत्ता व ज्ञानाची कास धरणारा शिक्षक वर्ग आपल्या महाविद्यालयात असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत असल्याचे प्राचार्य डॉ. अशोक नवले यांनी सांगितले. तर यावेळी प्रा. डॉ. पराग चौधरी, प्रा. मीनाक्षी पोकळे, प्रा. किशोर आढाव यांनी देखील मनोगत व्यक्त केले.