महाविद्यालयीन युवतींनी निर्भयपणे वावरावे: ज्योती आहेरकर

शिरूर तालुका

शिक्रापूर: महाविद्यालयीन युवतींनी शाळेत येत जात असताना कोणत्याची अमिषाला, त्रासाला बळी न पडता निर्भय पणे वावरावे वेळ प्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी असे आवाहन शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस नाईक ज्योती आहेरकर यांनी केले आहे.

कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात महाविद्यालयीन युवक व युवतींना मार्गदर्शन करताना महिला पोलीस नाईक ज्योती आहेरकर बोलत होत्या. याप्रसंगी याप्रसंगी पोलीस नाईक तळोले, अशोक केदार, किशोर शिवणकर, ज्ञानदेव गोरे, महिला पोलीस नाईक ज्योती आहेरकर, विद्यालयाचे नसीमा काझी, जोशना दरेकर, अर्चना टेमगिरे, शीतल धेंडे, मयुरी भुजबळ, राजाराम साबळे, अरुण भुजबळ, रावसाहेब थोरात, विशाल सोनवणे, विजय चव्हाण, अजिंक्य कडलग, विजय पाचर्णे, अजिंक्य कडलग, गौरव निकम, राहुल कुंभार, प्रशांत म्हेत्रे, शिवाजी पाखरे यांसह उपस्थित होते.

यावेळी बोलताना महिलांच्या व युवतींच्या सुरक्षितते साठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आलेली असून महाविद्यालय परिसरात पोलीस साध्या वेशात गस्त घालत असतात त्यामुळे शालेय परिसरात मुलींना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, तसेच मुलींना कोणापासून त्रास होत असल्यास त्यांनी निर्भयपणे तक्रार करावी, तक्रार दाराचे नाव देखील गुपित ठेवण्यात येईल, असे आहेरकर यांनी सांगितले, तर पोलीस नाईक अशोक केदार यांनी संकट समयी पोलिसांची मदत हवी असल्यास नवीन ११२ क्रमांकाचा वापर कसा करावा तसेच पोलीस काका संकल्पना याबाबतची माहिती उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब थोरात यांनी केले, तर अरुण भुजबळ यांनी आभार मानले.