शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला शासनाने ‘राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून, या पार्श्वभूमीवर तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विविध निकषांनुसार मंडळांची निवड करून त्यांना पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत, अशी माहिती तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, शिरूर बाळासाहेब म्हस्के यांनी दिली आहे
गुणांकनासाठी कलांचे जतन व संवर्धन – 20 गुण,
संस्कृतीचे जतन व संवर्धन – 20 गुण,निसर्ग व सार्वजनिक संपत्तीचे जतन व संवर्धन – 20 गुण,
सामाजिक कार्य – 20 गुण गणेशोत्सव आयोजनातील विधायकता – 20 गुण असे ठरविलेले निकष आहे.
या स्पर्धेत केवळ नोंदणीकृत संस्था अथवा परवानाधारक मंडळे सहभागी होऊ शकतील.
अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या पोर्टलवरून सादर करावा लागेल.
मागील सलग दोन वर्षे राज्यस्तरीय अथवा जिल्हास्तरीय पारितोषिके मिळालेल्या मंडळांना यंदा पारितोषिक मिळणार नाही.
स्पर्धेसाठी कार्याचा कालावधी मागील अनंत चतुर्दशीपासून चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशीपर्यंत विचारात घेतला जाईल.
तालुका स्तरीय समिती प्रत्यक्ष उत्सवस्थळी भेट देऊन छायाचित्रण, व्हिडिओ रेकॉर्डिंग करेल व मंडळांनी सादर केलेली कागदपत्रे तपासेल. गुणांकन करून तालुक्यातील एक विजेते मंडळ जिल्हास्तरीय परिक्षणासाठी शिफारस करण्यात येईल. विजेत्या मंडळाला स्पर्धेतील मिळालेल्या सर्वोच्च पुरस्काराचीच रक्कम देण्यात येणार आहे.
शिरूर तालुक्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन तहसिलदारशिरूर बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.