स्वर्गीय संतोषबापू गांधींचे काम उल्लेखनीय; अभिजित अनाप

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या माध्यमातून स्वर्गीय संतोषबापू गांधीं यांनी त्यावेळी केलेले सर्व काम उल्लेखनीय असून त्यांच्या कार्याची जाणीव सर्व कार्यकर्त्यांनी ठेवावी असे मत सह धर्मदाय आयुक्त अधीक्षक अभिजीत अनाप यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत आयोजित स्वर्गीय संतोषबापू गांधी स्मृती पुरस्कार प्रसंगी बोलताना सह धर्मदाय आयुक्त अधीक्षक अभिजीत अनाप बोलत होते, यावेळी सह धर्मदाय आयुक्त अधीक्षक अभिजीत अनाप, ग्राहक पंचायतचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य धनंजय गायकवाड, मध्य महाराष्ट्र प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी, मध्य महाराष्ट्र प्रांत सहसंघटन मंत्री रमेश टाकळकर, शिक्रापूर भैरवनाथ मंदिर ट्रस्ट अध्यक्ष राजाभाऊ मांढरे, पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप निंबाळकर, उपाध्यक्ष अशोक भोर, जिल्हा संघटन मंत्री भानुदास सरडे, जिल्हा कोषाध्यक्ष राघवदास चौधरी, शिरूर तालुकाध्यक्ष देवेंद्र जगताप, जिल्हा सहसंघटक तुकाराम फराटे, जिल्हा कार्यकारीणी सदस्य दिलीप बेंद्रे, महीला संघटक लताताई यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी स्वर्गीय संतोष बाप्पू गांधी स्मृती पुरस्कार उत्कृष्ट अधिकारी म्हणून अधिक्षक सह धर्मादाय आयुक्त अभिजीत अनाप यांना पुरस्कार देण्यात आला असून आंबेगाव तालुक्याला उत्कृष्ट तालुका पुरस्कार तर पुणे जिल्हा सचिव संतोष शिर्के, दौंड शहराध्यक्ष गणेश जगताप यांना उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार, पद्माताई पासलकर यांना उत्कृष्ट महिला कार्यकर्ती पुरस्कार, रोहिणी दरेकर यांना उत्कृष्ट महिला संघटन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, दरम्यान रमेश टाकळकर यांनी स्वर्गीय संतोषबापू गांधी यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी त्यावेळी केलेली आंदोलने, कामे, शासकीय कार्यालयांना केलेले पत्रव्यवहार, शासकीय कार्यालयात त्यांची घेतलेली दखल यांसह अनेक गोष्टींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना प्रशासनामध्ये काम करत असताना काय अडचणी येतात हे सांगत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्य खूप मोठे असून निरपेक्ष भावनेने कार्यकर्ते काम करत असल्याचे देखील सह धर्मदाय आयुक्त अधीक्षक अभिजीत अनाप यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दिलीप निबाळकर यांनी केले तर जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर यांनी आभार मानले.