कारेगाव (प्रतिनिधी) रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथुन शिवसेना युवा जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांचा ‘जॉन्सन’ नावाचा सायबर इन हस्की जातीचा कुत्रा गुरवार (दि १३) रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासुन बेपत्ता झाला असुन त्याला शोधून देणाऱ्या व्यक्तीस रोख ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासुन ‘जॉन्सन’ या कुत्र्याचा आम्ही घरातील सदस्य असल्यासारखा सांभाळ केला आहे. परंतु अचानक तो घरातुन बेपत्ता झाल्याने आमच्या कुटुंबातील सर्वजण चिंतीत आहेत. त्यामुळे हा कुत्रा कोणाला दिसल्यास 9850038888 या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन शिंदे यांनी केले असुन कुत्र्याचा शोध घेणाऱ्या व्यक्तीस ११ रुपयांचे रोख बक्षीस देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
इनामगावचे उपसरपंच सुरज मचाले यांनी वाचवले शेततळ्यात बुडणाऱ्या पाच शाळकरी मुलांचे प्राण