माजी आमदार अशोकबापू पवार यांच्या विशेष प्रयत्नातून सातकरवाडी शाळेला शालेय साहित्यासाठी मदत

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या प्रयत्नातून पिडीसीसी बँके मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातकरवाडी शाळेस शालेय साहित्य भौतिक सुविधा करिता 15 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

शिरूर हवेलीचे कार्यसम्राट माजी आमदारांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांच्या शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी माजी आमदार यांच्या विशेष प्रयत्नातून शिक्रापूर शाखेच्या पिडीसीसी बँकेच्या धर्मदाय निधीच्या अंतर्गत ही मदत प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असुन शैक्षणिक साहित्य जसे की वह्या, पेन, पेन्सिल, कंपास, इत्यादीं वस्तू खरेदी करण्यासाठी या निधीबद्दल सातकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांना गणेश सातकर यांनी वेळोवेळी या संबंधित निधीबद्दल माहिती दिल्याने सातकरवाडी शाळेला 15 हजार रुपयांचा धनादेश खरेदी-विक्रीचे संचालक सचिन दादा पवार,रा. प. घोडगंगा कारखान्याचे संचालक नरेंद्र माने, प्रदीप जाधव, यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी नानाभाऊ सातकर, सचिन सातकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष सातकर,जयकुमार कोकरे, गणेश सातकर, विनय सातकर, नितीन कोकरे, सागर सातकर, व शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव, पोपट रासकर, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थीत होते.