सविंदणे येथे भव्य विज्ञान प्रदर्शन; विशेष प्राविण्याबद्दल वरद मोटे या विद्यार्थाला सन्मानपत्र

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) सविंदणे (ता.शिरूर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री गुरूदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन, चित्रकला, पाककला, रांगोळी, वकृत्व, संगणक, कार्यानुभव इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

 

या विज्ञान प्रदर्शनामध्ये सौर उर्जा, पाणी प्रदुषण, हवा प्रदुषण, पदार्थांमधील भेसळ ओळखणे, रोबोटिक्स प्रकल्प, शेतीविषयक प्रकल्प, चांद्रयान ३ प्रतिकृती आदी प्रकल्पांचा समावेश होता. सर्व स्पर्धांमधील सहभागी विद्यार्थ्यांना बुधवारी (ता.१३) रोजी प्रमाणपत्र व प्रथम तीन क्रमांक पटकविणा-या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या विद्यालयातील विद्यार्थी वरद अरुणकुमार मोटे याने डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम फाऊंडेशन स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप अन्वये सॅटेलाईट लाँच व्हेईकल मिशन २०२३ मोहिमेत सहभागी होऊन विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल त्याला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

 

यावेळी सरपंच शुभांगी पडवळ, उपसरपंच नंदा पुंडे, माजी सरपंच सोनाली खैरे, माजी उपसरपंच भाऊसाहेब लंघे, भोलेनाथ पडवळ, ग्रामपंचायत सदस्य मालुबाई मिंडे, मनिषा नरवडे, रविंद्र पडवळ, परशुराम नरवडे, बाळासाहेब पडवळ, जितेश पवार, विठ्ठल पडवळ, माऊली पुंडे, प्राचार्य सखाराम पुंडे व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलोचना दुसाणे व आभार योगेश दुसाणे यांनी मानले.

 

स्पर्धांमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवणा-या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :

 

विज्ञान प्रदर्शन प्रकल्प लहान गट

प्रथम क्रमांक अश्लेषा लंघे, द्वितीय क्रमांक वरद मोटे, तृतीय क्रमांक यश इचके

 

विज्ञान प्रदर्शन प्रकल्प मोठा गट

प्रथम क्रमांक आशिष वागदरे, द्वितीय क्रमांक शिल्पा ठोंबरे, तृतीय क्रमांक सिद्धी येवले

 

चित्रकला स्पर्धा लहान गट

प्रथम क्रमांक श्रावणी पोकळे, द्वितीय क्रमांक साईराज उचाळे, तृतीय क्रमांक वरद मोटे

 

चित्रकला स्पर्धा मोठा गट

प्रथम क्रमांक आकांक्षा सांडभोर, द्वितीय क्रमांक तनिष्का बगाटे, तृतीय क्रमांक दिप्ती डांगे

 

रांगोळी स्पर्धा लहान गट 

प्रथम क्रमांक अश्लेषा लंघे, द्वितीय क्रमांक परिघा लंघे, तृतीय क्रमांक वेदांती कोळेकर

 

रांगोळी स्पर्धा मोठा गट 

प्रथम क्रमांक भक्ती लंके, द्वितीय क्रमांक प्रांजल उचाळे, तृतीय क्रमांक सानिया पिंजारी

 

पाककला स्पर्धा लहान गट 

प्रथम क्रमांक तन्वी पडवळ, द्वितीय क्रमांक पुर्वा लंघे, तृतीय क्रमांक तौफिक शेख

 

पाककला स्पर्धा मोठा गट

प्रथम क्रमांक संस्कृती झेंडे, द्वितीय क्रमांक साईदिप भोर, तृतीय क्रमांक सानिया पिंजारी

 

कार्यानुभव स्पर्धा लहान गट

प्रथम क्रमांक वरद मोटे, द्वितीय क्रमांक दिशा नेवकर , तृतीय क्रमांक आदिती पडवळ

 

कार्यानुभव स्पर्धा मोठा गट

प्रथम क्रमांक तेजल पडवळ, द्वितीय क्रमांक निखिल माकर, तृतीय क्रमांक आकांक्षा पडवळ

 

संगणक लँब प्रकल्प स्पर्धा लहान गट

प्रथम क्रमांक माधुरी भोर, आर्या पडवळ, द्वितीय क्रमांक प्रगती कोठारी , तृतीय क्रमांक अंकिता पडवळ, श्रावणी लंघे

 

संगणक लँब प्रकल्प स्पर्धा मोठा गट

प्रथम क्रमांक भोर भक्ती, द्वितीय क्रमांक ओम कोकरे, तृतीय क्रमांक ओम पडवळ, प्रणित लंघे