पुढच्या पिढीला कसण्यासाठी जमिनीला जिंवत ठेवा; जयवंत भगत

शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके): शेतीत पिकांचे भरघोस उत्पादन काढताना पुढच्या पिढीला जमीन चांगली द्यायची असेल तर ती आज व भविष्यात जिंवत राहिली पाहिजे यासाठी सुपिकता टिकवून ठेवावी लागेल. त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करुन जमिनीची सुपीकता राहण्यासाठी जैविक तसेच सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे गरजेचे असल्याचे कृषी सहायक जयवंत भगत यांनी व्यक्त केले.

निर्वी (ता. शिरुर) येथे मृदा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गावचे माजी उपसरपंच निलेश सोनवणे यांनी खोडवा उसात पाचट ठेवल्याने चांगला फायदा होऊन उत्पादन वाढीसाठी मदत होईल असे मत व्यक्त केले. तर मानसिंग पवार यांनी पाचट व्यवस्थापन मुळे एकरी खोडवा ऊसाचे 85 टन उत्पादन मिळेल असे सांगितले. तसेच जयवंत भगत यांनी माती परीक्षण मृद आरोग्य पत्रिकानुसार खत व्यवस्थापन जमिनीची सुपिकता साठी पाचट व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात मृदाचे पुजन मोहन सोनवणे, निलेश सोनवणे, विजय रोडे, बापु सोनवणे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी रेणुका गायकवाड, कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे, कांतीलाल वीर, कृषी सहायक संतोष फलके, वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष मानसिंग पवार, बापु सोनवणे, विजय रोडे, प्रफुल्ल सोनवणे, बापु विष्णू सोनवणे, शामराव सोनवणे, मारुती भोसले, बाळासाहेब, सोनवणे दत्तात्रय सोनवणे, ज्ञानदेव सोनवणे, नंदकुमार सोनवणे यांसह शेतकरी उपस्थित होते.