कामगार कायदे लागू, मात्र माध्यमकर्मी अजूनही वंचित; पत्रकार नोंदणीचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: केंद्र सरकारने देशात चार नवीन कामगार कायदे लागू करून कामगार सुधारणा दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले असले, तरी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांतील पत्रकार व माध्यमकर्मी या कल्याणकारी तरतुदींंपासून अजूनही वंचित असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. शहरी व ग्रामीण भागातील हजारो माध्यमकर्मी आजही सामाजिक सुरक्षा, नोंदणी, किमान वेतन आणि कल्याणकारी योजनांपासून दूर आहेत. […]

अधिक वाचा..

आंबेगावचा बिहार झालाय का…? पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर गावगुंडांचा हल्ला

शिरुर (तेजस फडके): समर्थ भारत या वृत्तपत्राच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मंचर येथील एका राजकीय पुढाऱ्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की करत, मारहाण केली असून याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास या गुंडांनी पत्रकार स्नेहा बारवे आणि समोर राजे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिलीये. या घटनेने पुणे जिल्ह्यात […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाने शिवसेनाप्रमुखांचा विश्वासू सहकारी गमावला

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक वाटचालीचा गेल्या पाऊण शतकाचा प्रत्यक्ष साक्षीदार हरपला मुंबई: मुंबईतील गिरणगावात वाढलेले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिसस्पर्श लाभलेले ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत महाराष्ट्राच्या गेल्या पाऊण शतकाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी ही त्यांची ओळख होती. शिवसेनेचे मुखपत्र ‘मार्मिक’चं कार्यकारी संपादकपद प्रदीर्घकाळ भूषवताना मराठी माणसाचे हक्क, मराठी अस्मितेचे रक्षण, […]

अधिक वाचा..

आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील पेन्शन, नियम व अटी शिथिल करा

मुंबई: आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील पेन्शन, नियम व अटी शिथिल करून ज्येष्ठ पत्रकार/ छायाचित्रकार यांना योजनेचा लाभ मिळण्याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात बैठक झाली. जेष्ठ अधीस्वीकृती पत्रकार कार्ड व आयकर भरावा लागत नाही या दोन कागदपत्रकारांच्या आधारे पेन्शन प्रकरणे मंजूरीचा निर्णय मंत्रालयीन अधिस्वीकृती समितीने घ्यावे असे निर्देश उपसभापती डॉ. […]

अधिक वाचा..

पोलिस कर्मचारी गजानन खत्री व पत्रकार अरुणकुमार मोटे यांच्यामुळे अखेर ‘त्या’ मयत व्यक्तीला मिळाला न्याय

शिरुर (तेजस फडके) शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत १० मार्च २०२४ मध्ये ‘अज्ञात’ बेवारस व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. त्या व्यक्तीचा खुन झाला होता. परंतु या प्रकरणी वरीष्ठांनी मयताला कोणी वारस नसल्याने तपास न करता ‘आर्थिक तडजोड’ करुन प्रकरण दाबल्याची लेखी तक्रार पोलिस स्टेशनमधील ‘गजानन खत्री’ या पोलिस हवालदाराने पोलिस अधिक्षकांकडे केली होती. परंतु ‘खत्री’ यांच्या विषयी […]

अधिक वाचा..

पत्रकारीता आणि प्रशासन समाजरथाची दोन चाके-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर: समाजाच्या विविध घटकांपर्यंत विकासाच्या योजना, उपाययोजना पोहोचविणे हे प्रशासनाचे काम असते तर पत्रकारीते मार्फत जनतेपर्यंत माहिती पोहोचविली जाते, त्यामुळे पत्रकारीता आणि प्रशासन ही समाजरथाची दोन चाके आहेत, परस्परांच्या सहकार्यावरच समाजाची प्रगती अवलंबून आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात दर्पण दिनाचे (दि. ६) औचित्य साधून आज पत्रकार सन्मान […]

अधिक वाचा..

पराभव दिसत असल्याने घातपाताची शक्यता, पत्रकाराला घरात घुसून धमकी 

मुंबई: मागील पाच वर्ष जनतेला वाऱ्यावर सोडणारे आमदार आदित्य ठाकरे पुन्हा निवडून येण्यासाठी उबाठा गट वरळीत घातपात शकतो, असा खळबळजनक आरोप शिवसेना सचिव व प्रवक्ते किरण पावसकर यांनी आज केला. पत्रकाराला घरात घुसून धमकी देणे, विविध वस्तू देऊन मतदारांवर दबाव टाकण्याचे प्रकार वरळीत सुरु असल्याचे पावसकर म्हणाले. वरळीतील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पत्रकाराला शिवीगाळ करणे पडले महागात, अखेर एसटी कर्मचाऱ्याचे निलंबन

आगार प्रमुख भैरवनाथ दळवी यांनी केली कारवाई शिरूर (तेजस फडके): शिरूर बस स्थानकामध्ये बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला तेथे दारूच्या नशेत असलेल्या शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्याने बातमी घेण्यापासून रोखून शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना एसटीच्या वर्धापनदिनी १ जुन रोजी घडली होती. शिरूर पोलीस स्टेशन येथे एसटी चालक शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्यावर कलम […]

अधिक वाचा..

शिरुर एस टी आगारात बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला एस टी कर्मचाऱ्याची शिवीगाळ 

शिरुर (तेजस फडके): शिरुर बस स्थानकामध्ये बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला तेथील दारुच्या नशेत असलेल्या शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्याने बातमी घेण्यापासून रोखून शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना एसटीच्या वर्धापनदिनी १ जुन रोजी घडली आहे. याबाबत शिरुर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कर्मचाऱ्याला पत्रकाराला शिवीगाळ करणे चांगलेच महागात […]

अधिक वाचा..

मंचर येथील पत्रकार सचिन तोडकर यांच्या चारचाकी गाडीने अचानक घेतला पेट

मंचर (प्रतिनिधी): येथील पत्रकार सचिन तोडकर आणि त्यांचे कुटुंबीय भीमाशंकर येथे बुधवार (दि 31) रोजी देव दर्शनासाठी जात असताना पोखरी गावच्या हद्दीत चारचाकी कारने बुधवार दुपारी अचानक पेट घेतला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पत्रकार तोडकर यांचे बंधू हनुमंत तोडकर हे पाठीमागे दुसऱ्या गाडीत असल्याने त्यांनी पत्रकार तोडकर यांना गाडी पेटल्याची तत्काळ फोनद्वारे माहिती […]

अधिक वाचा..