शिक्रापुरात आजोबांना मिळाली पत्नीची आठवण

शिरूर तालुका

मयत आजीचे चोरीला गेलेले दागिने आजोबांच्या स्वाधीन

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथे काही दिवसांपूर्वी घरात चोरी झाल्यानंतर आजीचे दागिने चोरीला गेले. त्यानंतर आजीचे कोरोनाने निधन झाले. पोलिसांनी चोरीचा छडा लावत आरोपींना जेरबंद करत आजीचे दागिने हस्तगत केले. मात्र आजी हयात नसल्याने पोलिसांनी कायदेशीर पूर्तता पुण करत आजीने दागिने आजोबांच्या स्वाधीन केले असल्याने आजोबांना पत्नी असलेल्या आजीचे दागिने दिल्याने आजोबांना आपल्या पत्नीची आठवण मिळाली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील रज्जूभाई तांबोळी हे बाहेरगावी गेलेले असताना होते. त्यानंतर तांबोळी हे घरी आले असता त्यांना दरवाजाचा कोयंडा तुटलेला तसेच घरातील सर्व साहित्य अस्थाव्यस्थ पडलेले दिसले. त्यावेळी पाहणी केली असता घरातील एलसीडी टीव्ही संच व सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत रज्जूभाई अमीनभाई तांबोळी रा. करंजेनगर २ (ता. शिरूर) जि. पुणे यांच्या फिर्यादीवरुन शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल केले मात्र कोरोना काळामध्ये रज्जूभाई तांबोळी यांच्या पत्नीचे देखील निधन झाले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शिक्रापूर पोलिसांनी काही आरोपी पकडत गुन्ह्याची उकल केली असता तांबोळी यांच्या घरातून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले होते. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांनी ॲड. गणेश दरेकर यांच्या माध्यमातून न्यायालयीन पूर्तता पूर्ण करत नुकतेच पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या हस्ते रज्जूभाई तांबोळी यांना त्यांच्या पत्नीचे दागिने देण्यात आले. त्यामुळे कोरोना मध्ये मयत झालेल्या आजीची आठवण रज्जूभाई या आजोबांना मिळाली, तर पोलिसांनी आपले दागिने मिळवून दिल्याबद्दल तांबोळी यांनी देखील पोलिसांचे आभार मानले.