शिक्रापुरात कचरा फेकणाऱ्यांचा ग्रामपंचायत मध्ये सन्मान

शिरूर तालुका

आम्ही शिक्रापूरकर ग्रुपच्या युवकांचा गांधीगिरीने अनोखा उपक्रम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील युवकांनी आम्ही शिक्रापूरकर या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत गावातील स्वच्छतेची मोहीम सुरु केलेली असताना गावामध्ये कोठेही उघड्यावर कचरा फेकणाऱ्या युवकांचा प्रशासनाच्या माध्यमातून दंड वसूल करणाऱ्यास सुरुवात केली असून उघड्यावर कचरा टाकणाऱ्या युवकांचा ग्रामपंचायत कार्यालयात फेटा बांधून पुष्पगुच्छ देत गांधीगिरी मार्गाने सत्कार करत 2 हजार रुपये दंड आकारण्यास सुरुवात करत गावात कोठेही कचरा न टाकण्याबाबत समज देण्यास सुरवात केली आहे.

Ranjangaon marathon
Ranjangaon marathon

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शंभर हून अधिक युवकांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत मी शिक्रापूरकर हि मोहीम सुरु केली. नुकतेच येथील पुलाची स्वच्छता करुन रंगररंगोटी करण्यास सुरवात केली आहे, तर सदर युवक त्यांच्या मोहिमेतून गावातील आदी सामाजिक प्रश्न सोडवणार आहेत.

सध्या गावामध्ये कचरा प्रश्नाबाबत जनजागृती करण्यात आलेली असताना देखील काही युवक उघड्यावर कचरा फेकून देत असल्याने आम्ही शिक्रापूरकर या समूहातील युवकांच्या वतीने कचरा फेकणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये घेऊन जात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कचरा टाकणाऱ्या नागरिकांचा ग्रामपंचायत कार्यालयात फेटा बांधून पुष्पगुच्छ देत गांधीगिरी मार्गाने सत्कार करण्यात येत असून प्रशासनाच्या वतीने दोन हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे.

सध्या गावातील स्वच्छता मोहीम युवकांनी हातात घेतलेली असताना नागरिकांनी व ग्रामस्थांनी दररोज येणाऱ्या कचरा गाडीतच कचरा टाकावा उघड्यावर कोठेही कचरा टाकू नये, असे आवाहन देखील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.