व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना; प्रा. हेमंत गावडे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): महाविद्यालयीन जीवनात व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे आदर्श व्यासपीठ असून युवकांनी यातून बोध घ्यावा, असे प्रतिपादन प्रा. हेमंत गावडे यांनी केले.

पाबळ (ता. शिरुर) येथील पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. हेमंत गावडे बोलत होते, सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय घोडेकर होते तर याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. रेहना बेग, डॉ. शिल्पा शेटे, डॉ. हनुमंत भवारी, प्रा. प्रवीण मोरे, प्रा. वैभव ऐदाळे, प्रा. योगेश डफळ, प्रा. हनुमान शिंदे, प्रा. जयश्री पिंगळे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. हेमंत गावडे पुढे म्हणाले कि स्वतःच्या मानसिक विकासासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता शाश्वत व वास्तव गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असून महाविद्यालयीन जीवनात शारीरिक विकासाकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. तसेच सध्याच्या फूड पासून स्वतःला वाचवण्याची गरज आहे. त्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत होणारे संस्कार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी वर्षाराणी जाधव यांनी केले तर प्रा. डॉ. गणेश सोनवणे यांनी आभार मानले.