शिरुर तालुक्यात विजय डिंबर यांना पंचायत समितीची उमेदवारी द्या…

राजकीय शिरूर तालुका

मच्छीमार समाज आणि युवक वर्गाची एकमुखी मागणी 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेसचे निष्ठावान नेते विजय रामचंद्र डिंबर यांना आगामी पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी काँग्रेस कार्यकर्ते, युवक, ग्रामस्थ व विशेषतः मच्छीमार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

विजय डिंबर यांनी NSUI पासून राजकीय वाटचालीला सुरुवात करत युवक काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग घेतला. पुढे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील विभागीय अध्यक्षपद भुषवले. त्यांची नेतृत्वशैली आणि संघटन क्षमता यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. तसेच त्यांचे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जवळचे संबंध असून, पक्षाच्या धोरणात्मक पातळीवरही त्यांचा ठसा आहे.

उद्योजक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान

शिरुर तालुक्यात विजय डिंबर यांनी व्यवसायिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, त्यांनी अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत.

मच्छीमार समाजासाठी विशेष योगदान 

मच्छीमार समाजाच्या हितासाठी त्यांनी जलसंपत्ती रक्षण, मत्स्य व्यवसायातील अडचणींचे निराकरण, तसेच शासकीय योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले आहेत. युवकांसाठी रोजगार मेळावे, प्रशिक्षण शिबिरे, तसेच सामाजिक उपक्रम यांद्वारे त्यांनी समाजाशी आपले दृढ नाते टिकवले आहे.

जनतेचा दृढ विश्वास डिंबर हेच योग्य उमेदवार…

विजय डिंबर यांच्या सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक कार्याचा विचार करता पंचायत समिती सदस्यपदासाठी ते योग्य उमेदवार ठरतील, असा विश्वास कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना अधिकृत उमेदवारी देणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.