शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे एका विवाहित महिलेचा छळ केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रुपाली शहादेव महाडिक, शहादेव महाडिक, पृथ्वीराज शहादेव महाडिक या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील करंजे मार्केट मधील शिला महाडिक या महिलेचे पती निलेश यांचे काही दिवसां[पूर्वी निधन झाले त्यानंतर तिचे सासू, सासरे, दीर तिला घरुन जाण्याबाबत तगादा लावत होते, मात्र शिला घरीच राहत असल्याने तिचे सासू, सासरे तिचा वारंवार छळ करत शिवीगाळ, दमदाटी करत करत राहिले, काही वेळा तिला मारहाण केल्याची देखील घटना घडली.
याबाबत शिला निलेश महाडिक (वय २३) रा. करंजे मार्केट शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विवाहितेची सासू रुपाली शहादेव महाडिक, सासरे शहादेव महाडिक, दीर पृथ्वीराज शहादेव महाडिक सर्व रा. करंजे मार्केट शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक किरण निकम करत आहे.