काय रस्ते, काय खड्डे, काय तो रस्ता, सगळं कसं ओक्केच!

शिरूर तालुका

हिवरे रस्त्यावर खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डे, नागरिक संभ्रमात

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातून हिवरे बाजूने जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असून येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अनेक होऊ लागले त्यामुळे येथील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिक करत आहे.

unique international school
unique international school

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथून हिवरे कुंभार, कान्हूर मेसाई, खैरे नगर, पिंपळे खालसा, खैरेवाडी, वाबळे वाडी यांसह आदी गावांना मिळणारा रस्ता असून येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून सदर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत आहेत, तर या भागात अनेक शाळा व महाविद्यालये असल्याने येथील शाळा व महाविद्यालय येथे येणाऱ्या जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, तर येथे रस्त्याच्या कडेला असेलल्या व्यावसायिकांना देखील मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे येथील रस्त्याची प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहे.