ramdas thite

पणती व दीव्यांनी उजळून निघणारा पवित्र उत्सव!

शिरूर तालुका

आई, ताई, माई, सौ आणि मांगल्याचे प्रतिक असणाऱ्या गृहदेवतांच्या हस्तस्पर्शाने मिठाईचे होणारे अवतरण …
अन्नपूर्णेची आराधना घरातच होते आणि आनंदाचे उधाणही प्रत्येकाच्या मनःपटलावर कुटुंबातच होते.
कधी सनईचा सूर तर कोठे मंत्रघोषाचा भावपूर्ण जागर, पहाटेची काकडआरती आणि तबकात ठेवलेले दिवे आसमंत उजळून टाकतात.
फटाक्यांचा आवाज, वीजेची रोषणाई आणि आधुनिक सुगंधी अत्तरे, उगाळलेले चंदन, मनमोहक फुलांचे हार, गजरे आणि प्रातः कालचे सुगंधी उटणे या ऐश्वर्याने समृद्ध जीवनविचार !

कोठे अनाथ आश्रमांत मिठाई वाटप तर कोठे कारागृहातील कैद्यांना गोड मिठाई, स्त्री – शिक्षणासाठी भाऊबीज नीधी तर काही ठिकाणी जवानांना भेटकार्डे असेही सामाजीक उपक्रम सुरु आहेत.
एकूणच आखिल मानवी समाजाच्या जीवनात उत्साह, आनंद आणि प्रसन्नता निर्माण करणारा दीपोत्सव…
ज्ञान – विज्ञान आणि सद्‌भावनांच्या या ज्योती अशाच प्रकाशमय रहाव्यात…
जूने दिप विझू नयेत, नवे दिप उजळत रहावेत…
मानवतेची आणि सृजनशील विचारांची उधळण आपल्या आयुष्यात सदैव होत रहावी !
दुःख, दैन्य, दारीद्रय नाहीसे व्हावे आणि विचारातून – विकासाकडे झेपावणारे माणूसकीचे क्षितीज कायम रहावे याच सर्व मान्यवरांना दीपोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !

– प्राचार्य रामदास थिटे
उपाध्यक्ष – पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ
कार्याध्यक्ष – शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ