शिक्रापूरच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्पर्धेत बारा सुवर्ण पदके

शिरूर तालुका

बारा सुवर्ण, पाच रौप्य व सहा कांस्य पदकांसह दुसरे चषक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील योगा कराटे सेंटरच्या खेळाडूंनी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभाग घेत तब्बल 12 सुर्वणपदके, 5 रौप्य पदके तर 6 कांस्य पदके पटकावत दुसऱ्या क्रमांकाचे चषकाचे मानकरी झाले असल्याची माहिती योगा कराटे सेंटरचे व्यवस्थापक अमोल बारडोले यांनी दिली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील योगा कराटे सेंटरमध्ये कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी नुकतेच योगा कराटे सेंटरचे व्यवस्थापक अमोल बारडोले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडियो शिटोरियो कराटे डो ॲकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

सदर स्पर्धेमध्ये भारतातील तब्बल 315 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये सुरज माहूलकर, धनश्री पिंपळे व करण मल्ला या तिघांनी दोन दोन सुर्वणपदके तर मृणाली कोरे, वरद चोधे, साची थोरवे, सई थोरवे, स्वप्नाली चोधे, श्रेया लांडे यांनी प्रत्येकी एक बारा सुवर्ण पदके मिळवली तर समर्थ वाव्हळ, श्रावणी रासकर, श्रेयस घाडगे, आयुष लांडे, ऋग्वेद पवार यांनी रौप्य पदके मिळवली आणि श्रेया लांडे, आर्यन खुर्पे, ओम कोरे, ज्ञानेश खैरे, कृष्णा आमटे व गौरव बिलोरीकर यांनी कांस्य पदके मिळवली आहे.

सर्व खेळाडूंनी विशेष कामगिरी करत महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचे चषक देखील मिळवून दिले असून यापैकी श्रेया लांडे, स्वप्नाली चोधे, धनश्री पिंपळे, सुरज माहूलकर, करण मल्ला व ओम कोरे या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असल्याचे देखील योगा कराटे सेंटरचे व्यवस्थापक अमोल बारडोले यांनी सांगितले आहे.