शिरुर तालुक्यात सेवानिवृत्त सैनिकाचा जल्लोषात स्वागत करत सन्मान

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): भारत देशाची सेवा करुन आपल्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या सैनिकासह त्याच्या कुटुंबीयांचा शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात स्वागत करत गणेशोत्सव निमित्त गणरायाची आरती करत सेवा निवृत्त सैनिक विलास दौंडकर यांचा सन्मान केला असल्याने सैनिक देखील भारावून गेले आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) गावचे भूमिपुत्र मेजर विलास वसंत दौंडकर नुकतेच सैन्यदलातुन 18 वर्षे सेवा करत निवृत्त होत देश सेवा करुन आपल्या मायभुमीत परतले. सेवानिवृत्त होत परतत असल्याने पिंपळे जगताप ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्त सैनिक विलास दौंडकर यांचा गावातील नागरिकांनी जल्लोष करत गणेशोत्सव मंडळाची आरती सेवानिवृत्त सैनिकांच्या हस्ते करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य सागर शितोळे, माजी चेअरमन निलेश फडतरे, कैलास बेंडभर, नामदेव बेंडभर, माजी सरपंच शिवाजी जगताप, अशोक जगताप, अशोक नाईकनवरे, रवींद्र जगताप, आकाश टाकळकर, भूषण शितोळे, सचीन विटकर, सुभाष जगताप, प्रसाद जगताप, अतुल तांबे, अजिंक्य तांबे, शाम बेंडभर, संतोष सोंडेकर, विठ्ठल जगताप, राहुल थिटे अरुण बेंडभर, रामदास शितोळे, योगीराज वाडेकर यांसह आदी उपस्थित होते, सेवानिवृत्त सैनिक विलास दौंडकर यांनी यापूर्वी पंजाब, झारखंड, राजस्थान, आसाम, अरुणाचल प्रदेश यांसह आदी ठिकाणी सैन्य दलातील सेवा सेवा कोर विभागात सेवा बजावत नुकतेच सेवानिवृत्त झाले.

त्यांनतर ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाने विलास दौंडकर भारावून गेले, तर आपल्या भागातील जवान देशाचे रक्षण करत सेवानिवृत्त होत असल्याची बाब युवा पिढीला प्रेरणादायी असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे यांनी व्यक्त केले. तर यापुढील काळात शेती व्यवसायामध्ये लक्ष केंद्रित करुन कुटुंबियांसह रमणार असून गावातील सन्मान सर्व सन्मानांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे विलास दौंडकर यांनी सांगितले.