मुखईच्या आश्रम शाळेत शाहू महाराज जयंती साजरी

शिरूर तालुका

शिक्रापूर: २६ जून हा लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जात असून मुखई येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनियर कॉलेज मध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनियर कॉलेज येथे उपक्रमशील प्राचार्य तुकाराम शिरसाट यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दरम्यान शाळेतील आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा दिला. शिक्षकांनी देखील आपल्या मनोगतातून शाहू महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

यावेळी बोलताना राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची आज समाजाला गरज असून शालेय विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचा प्रत्येकी एक गुण जरी आपल्यात आत्मसात केला तरी जयंती साजरी करण्याचे सार्थक होईल, असे प्रतिपादन प्राचार्य तुकाराम शिरसाट सर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता लिमगुडे यांनी केले तर मनोज धिवार यांनी आभार मानले.