ज्येष्ठ नागरिकांनी युवकांना मार्गदर्शन करावे: हेमंत शेडगे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने युवा वर्ग घडत असतो. मात्र सध्या युवकांना मिळणारे ज्येष्ठांचे मार्गदर्शन दुर्मिळ होत चाललेले असून ज्येष्ठ नागरिकांनी युवकांना मार्गदर्शन करावे, असे मत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी व्यक्त केले.

कोंढापुरी (ता. शिरुर) येथे उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक वाचनालयच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे बोलत होते. याप्रसंगी माजी पोलीस उपायुक्त फत्तेसिंह गायकवाड, माजी सरपंच स्वप्नील गायकवाड, संदेश गायकवाड, सुनील गायकवाड, ग्राहक पंचायतचे धनंजय गायकवाड, राहुल दिघे, नानासाहेब गायकवाड, पोलीस पाटील राजेश गायकवाड, तुषार गायकवाड, संदीप लवांडे, नितीन गायकवाड, मधुकर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, शांताराम गायकवाड यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना वाचनातून सर्वांचे ज्ञान वाढत असते तसेच विविध माहितत्या माहित होतात तर वाचन केल्याने ज्येष्टांना विरंगुळा देखील प्राप्त होतो त्यामुळे त्यांनी देखील वाचनालयाचा वापर करावा असे देखील हेमंत शेडगे यांनी सांगितले.