केंदूरच्या पाचवड शाळेत मार्गदर्शक शिक्षक व गुणवंतांचा सन्मान

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील पाचवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंथन व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करत सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला.

केंदूर (ता. शिरुर) येथील पाचवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी कोरोना काळात देखील ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण मुलांना देत मुलांची शिष्यवृत्ती पूर्व तयारी व व मंथन स्पर्धा परीक्षेची तयारी घेतल्याने शाळेतील १० विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेत यश संपादित केले. त्यामुळे सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

unique international school
unique international school

याप्रसंगी शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, माजी सभापती सुभाष उमाप, सरपंच अविनाश साकोरे, रामदास साकोरे, अभिजीत साकोरे, माऊली थिटे, उमेश साकोरे, गणेश साकोरे, रविंद्र साकोरे, विठ्ठल ताथवडे, अशोक भोसुरे, मंगेश भालेकर, सुधीर माशेरे, दादासो नाईकरे, शिवराम जाधव, धनराज पिंगळे, संपत पिंगळे, अनिल ठाकरे, विजय साकोरे, शंकर साकोरे, चंद्रकांत लिमगुडे, विश्वास लोखंडे, मोनल लिमगुडे, राजश्री साकोरे, स्वाती लिमगुडे, रेश्मा लिमगुडे, आरती लिमगुडे, मंदाकिनी नाईकरे, अनिता ठाकरे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी यशस्विनी ठाकरे, अपूर्व नाईकरे, ज्ञानेश्वरी लिमगुडे, श्रुती लिमगुडे, ईश्वरी माशेरे, श्राव्या जाधव, शौर्य जाधव, ईश्वरी पिंगळे, वैष्णवी पिंगळे, आयुष जाधव या गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांचे मार्गदर्शक शिक्षक कांता साकोरे व रोहिणी नाईकरे यांचा देखील सन्मान करण्यात आला. या आयोजित कार्यक्रमात काळूराम साकोरे यांनी शाळेच्या कार्यालयासाठी कारपेट बसवून देत असल्याचे जाहीर केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास साकोरे यांनी केले, तर प्रास्तविक रोहिणी नाईकरे यांनी केले आणि कांता साकोरे यांनी आभार मानले.