Midgulwadi home

मैत्रीचे नाते! जीवाला जीव देणारे मित्र भेटायला सुद्धा नाशिब लागतं…

शिरूर तालुका

शिरूरः मैत्री असावी तर कृष्ण-सुदाम्यासारखी, कर्ण-दुर्योधनासारखी. एखाद्या झऱ्याच्या वाहणाऱ्या निखळ पाण्यासारखी पारदर्शी. प्रत्येक सुख दुःखात, संकटांमध्ये साथ देणारेच खरे मित्र असतात. कठीण प्रसंगांमध्ये एखाद्या योद्याप्रमाणे मागे उभे राहतात. मित्र हे हिऱ्याप्रमाणे असतात. शिरूर तालुक्यातही जिवाला जिव देणारे अनेक मित्र आहेत.

आयुष्यामध्ये भरपूर नाती आहेत काही नाती जन्मताच असतात तर काही नाती जोडली जातात, मानली जातात. पण त्या सर्व नात्यांपैकी मैत्री हे नात सगळ्यात ग्रेट असत. एक मित्रच असतो ज्याच्या समोर आपण आपल्या मनातलं सर्वकाही स्पष्टपणे बोलतो. आपलं दु:ख वेदना सर्वकाही त्याच्यासोबत शेअर करतो. आपल्या आयुष्यामध्ये एखाद संकट आल की आपले खरे मित्रच संकटकाळी धावून येतात. शिरूर तालुक्यात असाच एक प्रत्येय आला आहे. एका मित्राच्या मदतीसाठी इतर मित्र धावून आले आहेत. शिरूर तालुक्यातील मिडगुलवाडी या छोट्याशा गावात मैत्रीचा सुगंध दरवळू लागला आहे. पंचक्रोशीमध्ये मैत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे.

विद्याधाम प्रशाला कान्हर मेसाई येथील s.s.c बॅच १९९३/९४ मधील काही मित्रांनी आपल्या गरीब मित्राला घर बांधून दिले आहे. सखाराम रघुनाथ मिडगुले असे या मित्राचे नाव आहे. शारीरिक आणि आर्थिक परिस्थिती कमजोर असलेला पण मनाने दिलदार असलेला सखाराम काही दिवस आजारी होता. मित्रांना हे समजल्यानंतर सुभेदार सुभाष पालेकर (मांदळेवाडी), खंडू गोरडे (शाळा व्यवस्थापन समिती, वरुडे), संतोषशेठ सुदाम पुंडे, प्रगतीशील शेतकरी, तात्याभाऊ ढगे, प्रगतीशील शेतकरी दिलीप आदक, उदयोजक, कान्हूर मेसाई, विजय तळोले (मेसाई अरोमा हर्बल) असे पाच-सहा मिञ सखारामला भेटायला गेले होते.

सखारामची घरची परिस्थिती पाहून लगेचच त्याला घर बांधून द्यायचा विचार केला. आपल्या वर्ग मित्रांना मदतीची हाक दिली सर्वांनी योगदान केले. विशेष म्हणजे दोन महिन्यात घर बांधून उभे राहिले आहे. त्यासाठी वर्ग मित्र सोडूनही गावातील काही दानशूरांनी सुद्धा आर्थिक मदत केली आहे. त्यामधे सर्वांत मोठी आणि मोलाची कामगिरी केली ते म्हणजे संजय पिंगळे यांनी. घराच्या पायापासून कलसापर्यंत काम विनाशुल्क करून दिले आहे. यामधे उद्योजक रोहिदास ढगे, राजुशेठ आदक, बबनदादा शिंदे, भाऊसाहेब गाजरे, अनिल मिडगुले, सरपंच नानासाहेब रुके, संतोष बबन पुंडे फौजी आदींचा मोलाचा वाटा आहे.

घराची वास्तुशांती, होमहवन आणि हस्तांतरण सोहळा निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर यांच्या हस्ते ३१/०७/२०२२ रोजी रविवार मिडगुलवाडी येथे होणार आहे. त्यांचे आयुर्वेदीक उपचार यावर दोन तास व्याख्यान होणार आहे. वास्तुशांतीचे औचित्यसाधून वर्ग मित्र, शिक्षक वृंद मेळावा आणि स्वागत तोडकर यांच्या माध्यमातून समाजाची अजून एक सेवा होत आहे. या वर्ग मित्रांचे काम अनुकरणीय आहे. सर्वच स्तरांवर कौतूक होत आहे.