पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पतीविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

क्राईम शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): पोटगीच्या वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शिरूर शहरात घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चित्रा विक्रम टोणगे (वय ३२, व्यवसाय घरकाम, मूळ रा. कोहकडी ता. पारनेर जि. अहिल्यानगर, सध्या रा. फाकटे ता. शिरूर जि. पुणे) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी विक्रम वाल्मीक टोणगे (रा. कोहकडी ता. पारनेर जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दि. २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास शिरूर गाव हद्दीत रामलिंग रोडवरील श्री हाइट्स समोर ही घटना घडली. फिर्यादी यांनी न्यायालयात पोटगीसाठी अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून आरोपी संतप्त झाला. त्यानंतर त्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर आरोपीने हातातील लोखंडी फायटरने फिर्यादीच्या डाव्या कानाच्या वरच्या भागावर वार करून तिला जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार जगताप हे करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत