balrangbhumi parishad

पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन!

शिरूर तालुका

पुणे (तेजस फडके): बाल रंगभूमी परीषद पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजीत नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्य छटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बालरंगभूमी परीषद पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा दीपाली शेळके यांनी दिली.

‘बालरंगभुमी परिषद पुणे जिल्हा दरवर्षी ऑगस्ट महिन्यात १ ली ते १० वीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी कै. नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती नाट्यछटा स्पर्धांचे आयोजन करते. या वर्षी देखील हि स्पर्धा आयोजित केली आहे. ग्रामीण व शहर अशा दोन विभागात होणार आहे. फॉर्म भरण्याची अंतीम तारीख स्पर्धकांच्या आग्रहामुळे २५ जुलै 2023 पर्यंत वाढवली आहे. केंद्रांवर प्राथमिक फेरी 25 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीमध्ये तर अंतीम फेरी 13 ऑगस्ट 2023 रोजी ना. दा. ठाकरसी विद्यालय, पुणे. येथे सकाळीं 9 .00 सुरू होणार आहे. पारितोषीक वितरणाचा कार्यक्रम 13 ऑगस्ट 2023 रोजी अंतिम फेरी केंद्रावरच संध्याकाळी 5 वाजता संपन्न होईल असे, दीपाली शेळके यांनी सांगितले.

‘प्रत्येक गटात अभिनय ३, उत्तेजनार्थ ३ व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रत्येक केंद्रावर स्पर्धा चार गटात होईल. गट १: १ली, २री, गट २: ३री, ४थी, गट ३: ५वी ते ७वी, गट ४: ८वी आणि ९वी. असे गट असणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हे मोठे व्यासपीठ आहे. यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष दीपक रेगे, उपाध्यक्ष अरुण पटवर्धन, नारायण करपे यांच्यासह बालरंगभूमीचे प्रमुख कार्यवाह देवेंद्र भिडे आणि कोषाध्यक्ष सत्यम कोठावदे यांनी केले आहे.

दरम्यान, 25 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान त्या-त्या तालुक्यातील केंद्रांमध्ये सोयीनुसार प्राथमिक फेरी होईल, अशी माहिती बालरंगभूमीचे कार्याध्यक्ष दिपक रेगे आणि निळू फुले अकादमी चे विश्वस्त सुरेश देशमुख यांनी दिली.

फॉर्म भरण्याची अंतीम तारीखः 25 जुलै 2023
प्रवेश फीः 150/- रुपये

प्राथमिक फेरीः 25 जुलै ते 10 ऑगस्ट 2023
अंतीम फेरीः 13 ऑगस्ट 2023
ना. दा . ठाकरसी विद्यालय सकाळीं 9 वाजता
पारीतोषीक वितरणः 13 ऑगस्ट 2023 संध्याकाळी 5 वाजता

फॉर्म मिळण्याचे ठिकाणः
शहर आणि ग्रामीण मधील नियोजित केंद्रांवर मिळतील

संपर्कः
दीपाली शेळकेः ९८२२५ ५५५२२
देवेंद्र भिडेः ७४२०० ५०२९७

स्पर्धा-प्राथमिक फेरी शहर केंद्र
१) बालरंजन केंद्र, भारती निवास सोसायटी
दीप्ती कलगौड – ९६५७०६२६१५
२) निळू फुले कला अकादमी, शास्त्री रोड
आनंद जोशी : ९५९५२०२२४४
३) आर्यन स्कूल, कात्रज
मुग्धा वडके : ९८५०३२७३८२
४) अभिनव कला बाल मंच ,सिंहगड रस्ता
स्मिता मोघे : ८०८०१३९६३५
५) इंद्रायणी स्कूल आंबेगाव
जतीन पांडे : ९८२२६४००१९
६) स्वर्गीय एन. जी. बराटे शिक्षण संस्था , ब्ल्यू बर्ड स्कूल कोंडवे धावडे जतीन पांडे : ९८२२६४००१९
७) श्रीमती एस. डी. गणगे प्रशाला कृष्णा नगर , चिंचवड पुणे
प्राचार्य चिकटे सर : ९५२७८५०३८३
८) जयवंत प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय, भोईर नगर, चिंचवड पुणे 33.
मुख्याध्यापक : वंदना सावंत : ९६५७५५८१६९
मुख्याध्यापक : अजय रावत : ८०८७४५७३१९

प्राथमिक फेरी ग्रामीण केंद्र
१) दौंड – शिशु विकास मंदिर
सुश्मिता पगी : ७८८७३८६१२२
२) शिरूर – केंद्र १) श्री महागणपती ग्रुप ऑफ स्कूल रांजणगाव गणपती
वैशाली पोतदार : ९१७५००२६४१
केंद्र २ ) ज्ञानगंगा विश्वविद्यालय बाबुराव नगर शिरूर
प्रिन्सिपल सुनंदा लंघे: ९२७१११४१९९
३) पुरंदर – पुरंदर हायस्कूल ,सासवड
गोरवे सर : ९८८१६९३०५०
४) भोर – राजा रघुनाथराव विद्यालय मंजुषा भागवत : ९८८१८९९८८७
५) मावळ – नवीन समर्थ विद्यालय, तळेगाव दाभाडे
प्रभा काळे : ९८२२४९५४७५
६) हवेली – केंद्र १) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणीकंद ,
संध्या धुमाळ : ९७६५६२८६९०
केंद्र २) महात्मा गांधी विद्यालय, उरुळी कांचन
राजेंद्र बोधे : ९७६४३०४०३४
संगीता शिर्के : ९४२०६८३०३७
७) इंदापूर – कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय , कुरवली
प्राचार्य गणेश घोरपडे :९४२२५३८०४९
सुधीर कदम : ९९७५९५३९४३
८) खेड – स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चाकण नारायण करपे : ९७६७५५४२६५, प्रमिला गोरे : ९९२२९९८१८६
९) बारामती – एम .इ .एस हायस्कूल , बारामती .
प्राचार्य प्रकाश खोत :९८६०९१५८६१
संतोष जगताप : ९८६०३४८२८२
१०) वेल्हे – श्री सरस्वती विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय वेल्हे प्राचार्य हनुमंत घनवट : ९९७०३९७१४५
स्वाती पवार : ९५६१८९६७७४
११) आंबेगाव – न्यू इंग्लिश स्कूल , लांडेवाडी
अनुराधा काळे : ७२७६०१५०१०
१२) जुन्नर – रा . प . सबणीस विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय , नारायणगाव
प्राचार्य पुराणिक मॅडम : ९०९६८६ ९५४९
१३) मुळशी – हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल, कासार – आंबोली
प्राचार्य रेणू पाटील : ७७०९१६३५०५