Jategaon ssc result

जातेगांवच्या संभाजीराजे विद्यालयाची १००% निकाल परंपरा कायम…

शिरूर तालुका

९५ टक्के गुण मिळवत तेजल डफळ प्रथम…
शिक्रापूरः दहावीचा निकाल आज (शुक्रवार) ऑनलाईन जाहीर झाला असून, जातेगाव बु. (ता शिरूर) येथील संभाजीराजे विद्यालयाने १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयातून एकूण ६४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ३३ विद्यार्थ्याना विशेष प्राविण्य श्रेणी गुण प्राप्त झाले आहेत. निकालाचे हे वेगळे वैशिष्टय आहे,’ अशी माहिती प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली. शिक्षकांचे नियोजनबद्ध वार्षिक अभ्यासक्रम नियोजन, तंत्रस्नेही ई- क्लास रूम अध्यापन, नीट व जेईई अभ्यासक्रमाचे घटकनिहाय मार्गदर्शन, सातत्यपूर्ण चाचणी व निकाल विश्लेषण, सत्र व वार्षिक परिक्षांचे कालबद्ध आयोजन, विषय तज्ञ मान्यवरांची व्याख्याने, संस्था नियामक मंडळाचे शालेय नियोजन व प्रेरणा पालकांचा २२ वर्ष विद्यालया वरील विश्वास, गुणवत्तेस सदैव प्राधान्यक्रम यामुळे हे यश प्राप्त झाले आहे, अशी प्रतिक्रीया प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली आहे.

गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणेः
प्रथम – तेजल संतोष डफळ 95 %
द्वितीय – आदिती आकाश वाघचौरे- 93.80%
तृतीय – वैष्णवी संपत उमाप 93 २०%

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुगंधराव उमाप सचिव प्रकाश पवार यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. संस्था मार्गदर्शक व माजी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी भविष्यकालीन वाट चालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.