धक्कादायक; शिरूरच्या बाबुरावनगरमधून लहान मुलाला नेले पळवून

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यात लहान मुलांसह तरुण मुला-मुलींचे, विवाहीत महीलांचे पळून जाण्याचे व पळवून नेण्याचे प्रकार वाढले असून याबाबत नागरीकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. शिरुर शहरातील बाबुराव नगरमधील प्रज्वल गिरे या आठ वर्षीय मुलाला कोणीतरी अज्ञात इसमाने अमिष दाखवून त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेत पळवून नेल्याची घटना घडली असुन याबाबत त्याची आई प्रिती विनोद गिरे यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पळवून नेलेल्या मुलाचे नाव प्रज्वल विनोद गिरे (वय.08 वर्ष) रंग काळा, सावळा, उंची 4 फुट, केस काळे, अंगात हिरव्या रंगाचा हाफ बाहयाचा टी शर्ट, पांढ-या रंगाची हाफ पॅन्ट, निळया रंगाचे जर्किंग त्याचे पाठीमागे पी. एस.ए कराटे क्लब शिरूर असा लोगो असलेला, पायात मोसंबी रंगाची चप्पल, उजवे हातचे दंडावर जुनी जळालेची जखम, भाषा हिंदी, मराठी बोलतो.

दि. २२ जानेवारी रोजी सांयकाळी 5:30 च्या सुमारास प्रज्वल विनोद गिरे हा फिर्यादीचा पती यांना तो कामास गेलेले ठिकाणी जातो म्हणुन बाबुरावनगर शिरूर ता. शिरूर जि. पुणे गावच्या हददीतुन राहत्या घराच्या रोडवरून निघुन वडीलांकडे जाण्यास निघाला असता त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी अमिष दाखवून त्याच्या अज्ञात पणाचा फायदा घेवून माझे कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे. या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार हे करत आहे.