सुभाष विद्यामंदिरच्या सवंगड्यांची ३६ वर्षानंतर भरली शाळा

शिरूर तालुका

कासारीतील हिराबाई गायकवाड विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

शिक्रापूर: कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात तळेगाव ढमढेरे येथील सुभाष विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला असल्याने शालेय सवंगड्यांची तब्बल ३६ वर्षांनंतर शाळा भरल्याचे दिसून आले.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालय येथे तळेगाव ढमढेरे गावातील जुन्या सुभाष विद्यामंदिर या शाळेमध्ये १९८४ ते १९८५ साली दहावीला असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी व समता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे, माणिक काळकुटे, उद्योजक संतोष हबडे, बाळासाहेब दरेकर, सुरेश ढमढेरे, विजय जेधे, प्रकाश तकटे, संतोष गुंदेचा, मच्छिंद्र नरके, उषा भुजबळ, राजाराम साबळे, डॉ. हेमंत दातखिळे, मनोरमा खेडकर, नीलिमा ढमढेरे, दिलीप सातपुते, महादू रासकर आदींनी आयोजित केला होता. सर्व शालेय मित्र तब्बल ३६ वर्षानंतर एकत्र आल्याने सर्वांचेचेहेरे आनंदी तर काहिशा भांबावलेल्या अवस्थेत होते. माजी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक, व्यावसायिक, शिक्षण संस्थाचालक, शिक्षक, वकील, डॉक्टर, पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कंपनीतील अधिकारी, प्रगतशील शेतकरी असा संगम झाला आहे. कार्यक्रमात सुभाष विद्या मंदिरचे तत्कालीन मुख्याध्यापक अंकुश पठारे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी यावेळी सुभाष विद्यामंदिरचे तत्कालीन शिक्षक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक वि. ल. पाटील, प्रभाकर मुसळे, दत्तात्रय गायकवाड, टेमगिरे सर, सेवक चंदूकाका, कासारी येथील हिराबाई गायकवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक सरोदे, ज्येष्ठ अध्यापिका नसीमा काझी, राजाराम साबळे, अरुण भुजबळ, रावसाहेब थोरात, राहूल आल्हाट, हेमंत पाटील आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या वतीने माजी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केले, तर माजी विद्यार्थी व गुरुजनांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र नरके यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. राजेंद्र ढमढेरे यांनी केले आणि अरुण भुजबळ यांनी आभार मानले.