शिरुर तालुक्यातील तो नरभक्षक बिबटया अदयापही सापडेना

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील १९ वर्षीय पुजा नरवडे या युवतीवर हल्ला करुन ठार मारणारा नरभक्षक बिबटया ४ दिवस ऊलटूनही अदयाप गजाआड न झाल्याने जांबुतसह बेट परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे दिवसाही शेतामध्ये कामासाठी जाण्यास शेतकरी, मजूर घाबरत आहे.

वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी ठाण मांडून रात्रंदिवस विविध प्रयोग राबवत बिबटया पकडण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. परंतू बिबटया त्यांना हुलकावनी देत आहे. ड्रोनद्वारे, कॅमेरे लावून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न होत आहे. आधीच अतिवृष्टी त्यात बिबट्याचा त्रास त्यामुळे शिरुर तालुक्यातील शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्या पकडण्याचे आव्हान वन विभागापुढे उभे निर्माण झाले आहे.

शिरुर तालुक्यात शेकडो बिबटे असून ते शेतकऱ्यांच्या पशूधनाबरोबरच नागरीकांवर हल्ले करत असल्याने त्यांना तात्काळ वेळीच पकडून न नेल्यास असे प्रसंग वारंवार उद्भवणार आहे. बिबटयांना पकडून माणिकडोह येथे बिबट निवारण केंद्रात सोडले जाते. तेथून ते पुन्हा या भागात येत असल्याचे नागरीक सांगत आहे. त्यांचा वनविभागाने कायमच बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.