वनविभागाच्या वनरक्षक रुमचे दरवाजे तोडून चोरी

क्राईम शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): वनविभागाच्या नव्याने बांधकाम केलेल्या मलठण (ता. शिरुर) येथील रुममधील दरवाजासह लोखंडी नळ, शॉवर व बेसीन अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने शिरुर पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, वनविभागाच्या मलठण (ता. शिरुर) येथील बिटामधील नविन बांधकाम केलेल्या वनरक्षक रुम कॉर्टरमधील बेडरुमला बसविलेला थ्रिडी प्रिंट दरवाजा, किचनचा थ्रिडी प्रिंट दरवाजा, टॉयलेट बाथरूमचे फायबरचे २ दरवाजे, किचनमधील किचन कटटयाचे लोखंडी बेसीन, त्यावरील लोखंडी नळ, बाथरुमधील शॉवर व नळ कॉक, टॉयलेटमधील कॉक व हात धुण्याकरीता लावलेले बेसीन तसेच हॉलमधील व बेडरुमधील फर्निचर केलेल्या कपाटाचे दु झडपी दोन दरवाजे असे एकुण २१,००० रु. मुद्देमाल अज्ञान चोरट्याने चोरुन नेला आहे.

याबाबत वनविभागाच्या वनरक्षक सविता अशोक चव्हाण यांनी अज्ञात चोरट्याविरोधात शिरुर पोलिस स्टेशन विरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक धनंजय थेउरकर हे करत आहे.