मोराची चिंचोलीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी वामनराव नाणेकर

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): मोराची चिंचोली (ता. शिरुर) या पर्यटन क्षेत्र असलेल्या गावची तंटामुक्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली असून यावेळी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी वामनराव नाणेकर तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब थोपटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मोराची चिंचोली (ता. शिरुर) गावची विशेष ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली, यावेळी गावच्या जलजीवन मिशन, वन समिती, कोविड लसीकरण या विषयांवर चर्चा होत तंटामुक्ती समितीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

यावेळी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी वामनराव नाणेकर यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब थोपटे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच अशोक गोरडे, उपसरपंच राहुल नाणेकर, ग्रामविकास अधिकारी संतोष गिरी, तलाठी अशोक बडेकर यांसह ग्रामस्थ व विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी वामनराव नाणेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडीनंतर वामनराव नाणेकर व बाळासाहेब थोपटे यांचा नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशन व शिवभिमान कला क्रीडा मंच यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर निवडीनंतर बोलताना गावातील तंटे गावातच मिटवून गाव तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वामनराव नाणेकर यांनी सांगितले.