धानोरेत ग्रामपंचायत कडून शाळेला संगणक संच भेट

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): धानोरे (ता. शिरुर) येथील शेरी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ग्रामपंचायतच्या वतीने संगणक संच भेट देण्यात आला असून नुकतेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संगणक संच शाळा व्यवस्थापनाकडे सुपूर्त करण्यात आला आहे.

धानोरे (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरी वस्ती या शाळेसाठी संगणकाची आवश्यकता असल्याने शाळेच्य वतीने ग्रामपंचायत कडे संगणकची मागणी करण्यात आलेली होती. त्यानुसार ग्रामपंचायतच्या वतीने शाळेला संगणक भेट देण्यात आला.

याप्रसंगी सरपंच कालिदास झगडे, उपसरपंच ऋतुजा भोसुरे, ग्रामपंचायत सदस्या वैशाली येवले पाटील, सदस्य शांतीलाल भोसुरे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र गोसावी, माजी उपसरपंच संदीप कामठे, गुलाब बढेकर, सामाजिक कार्यकर्ते मधुकर कोंडे, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका शीतल नवले – तावरे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गावातील शाळेंना आवश्यक ती सर्व मदत करुन शाळेचा दर्जा वाढवत शाळा आदर्श करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्या वैशाली येवले पाटील यांनी सांगितले. दरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका शीतल नवले – तावरे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले.