V.R.Innovation

वाघोलीमध्ये V. R. Innovators च्या सांस्कृतीक उत्सवाला मोठा प्रतिसाद!

शिरूर तालुका

वाघोलीः वाघोली आणि वाघोलीच्या परिसरातील महिलांसाठी उपयुक्त असणाऱ्या V.R.Innovators ग्रुपच्या माध्यमातून नुकतेच सांस्कृतीक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला मोठा प्रतीसाद मिळाला आहे, अशी माहिती उत्सव प्रमुखांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना दिली.

वाघोली आणि परिसरातील महिलांसाठी V.R.Innovators हा ग्रुप गेल्या काही वर्षांपासून काम करत आहे. परिसरातील परस्पर पूरक काम करणाऱ्या महिलांना या ग्रुपची नेहमीच मदत होत आहे. ज्या महिला वर्क फ्रॉम होम प्रकारची नोकरी करतात आणि ज्या गृहिणी आहेत, अशा महिलांना आपल्या कुटुंबासाठी आर्थिक हातभार लावण्यासाठी या ग्रुपच्या मोठा फायदा होताना दिसत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना ‘माहेर’ सारखे आश्रयस्थानही मिळालेले आहे.

शुभ्रा माथूर, अंकिता श्रीवास्तव, मोनिका खेरा यांच्या कल्पकतेतून २०१७ मध्ये V.R.Innovators हा ग्रुप सुरु करण्यात आला आहे. याद्वारे परिसरातील महिलांसाठी व दुर्बल घटकातील महिलांसाठी सांस्कृतिक उत्सव पद्धतीने विविध उपक्रमाचे प्रदर्शन आयोजित केले जाते. २५ फेब्रुवारी २०२३ रोजी वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे महाविद्यालच्या प्रांगणामध्ये सांस्कृतीक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपसरपंच समीरअप्पा भाडळे व त्यांच्या पत्नी पूजा भाडळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शुभ्रा माथूर, अंकिता श्रीवास्तव, तरुण माथूर, श्री. राज, सौ. श्रद्धा, सौ. हिरल. यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये खाद्यपदार्थ व इतर वस्तूंचे ४५ पेक्षा अधिक स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये महिला व लहान मुलांसाठी दागिने, कपडे, बॅग, सौंदर्य प्रसाधने यांचा समावेश होता. या कार्यक्रमध्ये ६०० ते ७०० नागरिकांनी सहभाग घेतला होता. उपक्रम महिला व लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त व यशस्वी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले आहे.