jategaon ssc examination

शिरूर तालुक्यातून दहावी परिक्षेस ६०१८ विद्यार्थी प्रविष्ट…

शिरूर तालुका

शिरूरः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा गुरुवार (ता. २) पासून सुरू झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी शिरूर तालुक्यातून एकूण ६०१८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत. शिरूर तालुक्यात दहावीची एकूण १४ मुख्य केंद्र आहेत, अशी माहिती पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली.

मौजे जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री. संभाजीराजे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिरूर तालुक्यातील दहावी परीक्षा सुरळीतपणे व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडणेकामी परिरक्षक गटशिक्षणाधिकारी आनिल बाबर, उपपरिरक्षक जिजाबापू गट, सहायक परिरक्षक श्रीकांत निचित व केंद्रसचालक, परिक्षक व पर्यवेक्षक विशेष परिश्रम घेत आहेत.

शिरूर तालुक्यातील दहावी परीक्षेबाबत केंद्रनिहाय माहिती गटशिक्षणाधिकारी आनिल बाबर यांनी दिली. ते म्हणाले, ‘परीक्षा कामकाजाबाबत पूर्ण तयारी झाली असून, कॉपीमुक्त अभियानांतर्गत पंचायत समिती शिरूर विभागाचे स्वतंत्र पथक कार्यरत असून केंद्रावर भेटीचे नियोजन केले आहे.’

तालुक्यातील केंद्राचे नाव – व विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे
१ . विद्याधाम प्रशाला शिरूर – ६००
२ . न्यू इंग्लिश स्कूल शिरूर – ५०७
३. मल्लिकार्जुन विद्यालय न्हावरे – ५५२
४ . न्यू इंग्लिश स्कुल – मलठण – ४९९
५ . सरदार रघुनाथ ढवळे हायस्कूल केंदूर – १०२
६ . छत्रपती संभाजी हायस्कूल कोरेगाव – ३११
७ . श्री संभाजीराजे माध्यमिक विद्यालय जातेगांव – ३३७
८ . स्वा से .आर बी गुजर प्रशाला . तळेगाव _५२७
९ . विद्याधाम प्रशाला – शिक्रापूर – ८७०
१० . छत्रपती हायस्कूल . वडगाव रासाई – ३२६
११ . भैरवनाथ विद्यालय करडे – ४३८
१२ . विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी – ३१३
१३ . मान बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी – ३५८
१४ . वाघेश्वर विद्याधाम प्रशाला . मांडवगण फराटा . २१८
एकूण – ६०१८