नवीन शैक्षणिक धोरणाबाबत जागृकता करणार: प्रा. मोहीते

शिरूर तालुका

शिक्रापूर: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागृकता आणि साक्षरता निर्माण करुन प्रभावी अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब मोहीते यांनी केले.

unique international school
unique international school

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासगट सदस्यपदी प्राचार्य काकासाहेब मोहीते यांची निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके, सचिव प्राचार्य रामदास थिटे, उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, सहसचिव मारुती कदम, अशोक सरोदे यांसह आदी उपस्थित होते.

सदर सन्मान प्रसंगी बोलताना शिरुर तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात येईल तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत व दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेबाबत असलेले समज, गैरसमज दूर केले जातील, असे आश्वासन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासगट सदस्य प्राचार्य काकासाहेब मोहीते यांनी यावेळी दिले.