शिक्रापूर: धानोरे (ता. शिरुर) येथील संदीप भोसुरे हे सायंकाळच्या सुमारास भीमा नदीकडे गेलेले असताना त्यांना नदीच्या पाण्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असताना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी सदर ठिकाणी जात पंचनामा करुन मृतदेह पाण्याबाहेर काढला यावेळी आजूबाजूला चौकशी केली असता सदर व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही.

सदर व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाचा असून त्याच्या अंगावर अंडरवेअर व्यतिरिक्त काहीही कपडे नाही, त्याचे केस काळे, दाढी वाढलेली, उभट चेहरा असे वर्णन असून या व्यक्तीबाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ९८२२१७३४११ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे. तर याबाबत पोलीस पाटील स्वप्नील कैलास झगडे (वय ३२) रा. धानोरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.