शिरुर तालुक्यातील माशेरे महाराज मनमंदीरा कार्यक्रमात झी टॉकीजवर

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावचे नावाजलेले युवा किर्तनकार ह.भ.प. प्राध्यापक नवनाथ महाराज माशेरे यांचे (दि. २५, २६ व २७) जुलै रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत झी टॉकीजच्या मराठी वाहिनीवर मनमंदिरा या किर्तन मालिकामध्ये किर्तनसेवा होणार आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

माशेरे महाराजांनी आपल्या मधूर वाणीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम हाती घेतले आहे. झी टॉकीजवर ३ दिवस होणाऱ्या किर्तन सेवेतून महाराजांनी समाजप्रबोधन व्हावे म्हणूने व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, तरुणांचा मोबाईलवर होणारा अति वापर व त्यामुळे होणारे आरोग्यावर परिणाम व संतश्रेष्ठ निळोबाराया हे वारकरी संप्रदायातील शेवटचे संत यांचा जन्म शिरुर (रामलिंग) विठ्ठलवाडी या गावचे महत्त्व सांगून महाराजांनी या किर्तनातून समाज प्रबोधन केले आहे. तरी या किर्तन सेवेचा नागरीकांनी झी टॉकीजवर लाभ घेण्याची विनंती आमदाबाद येथील ग्रामस्थांनी केली आहे.