महिलांनी प्रशिक्षणातून व्यवसाय उभारावा; कुसुम मांढरे

शिरूर तालुका

माहेर संस्थेच्या वतीने महिलांना मोफत आत्मनिर्भयतेचे प्रशिक्षण

शिक्रापूर (शेरखान शेख): महिलांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रशिक्षणाचा उपयोग महिलांनी आपल्या स्वावलंबनासाठी करत प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यवसाय उभा करावा, असे मत जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे माहेर संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी स्वावलंबन प्रकल्पाचे माध्यमातून बचत गटातील महिलांना आत्मनिर्भर भारत अंतर्गत सौंदर्य व शिवण कामाचे त्रिमासिक प्रशिक्षण देत त्याबाबत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असता यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे बोलत होत्या.

याप्रसंगी माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, डॉ. पार्वती कदम, डॉ. खाडिलकर, संगीता अहिरे, दिलीप देशमुख, क्रिडा शिक्षक प्रशांत गायकवाड, स्वावलंबन प्रकल्प प्रमुख विजय तवर, वुर्शभ खडसे, समन्वयक निर्मला तोडकर, नमिता वाळुंज, जयश्री मुळीक, सुषमा रासकर, सुषमा गायकवाड, तेजस्विनी पवार, पल्लवी खामकर यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर यावेळी बोलताना माहेर संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत असून सदर योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांनी केले.

दरम्यान अनेक महिलांनी मनोगत व्यक्त माहेर संस्थेच्या योजनांचा आम्हाला निच्छिताच फायदा होईन असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी पवार यांनी केले तर पल्लवी खामकर यांनी आभार मानले.