कान्हूर मेसाईच्या विद्याधामची शिष्यवृत्तीत दमदार कामगिरी

शिरूर तालुका

शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत आठवीचे तीन विद्यार्थी

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पाचवीचे चार व आठवीचे तेरा असे तब्बल सतरा विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले असून यापैकी आठवीचे तीन विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये झळकले असल्याची माहिती माहिती प्राचार्य अनिल शिंदे यांनी दिली आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेले होते, शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयातील इयत्ता आठवीतील प्रज्ज्वल धुमाळ २५८ गुण, सुजित थोपटे २५६ गुण, अथर्व ननवरे २५४ गुण, तनुजा पुंडे २४६ गुण, साक्षी नरवडे २३८ गुण, श्रेयस खैरे २२६ गुण, आयुष दंडवते २२० गुण, सार्थक तळोले २१६ गुण, संकुल डफळ २०८ गुण, ईश्वर पिंगळे २०२ गुण, मयूर ढगे २०० गुण, कुणाल भोर व प्रज्योत शिंदे १९४ गुण या विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले.

तसेच इयत्ता पाचवीतील अपूर्व शिंदे २५२ गुण, साई तांबे, आरव नाणेकर, स्वराज मांदळे तिघे २४८ गुण अशा प्रकारे गुण मिळवत चौघांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले असून यापैकी आठवतील प्रज्वल धुमाळ, सुजित थोपटे व अथर्व ननवरे यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मनोज धुमाळ, विनोद शिंदे, दगडू दंडवते, अविनाश दौंडकर, धनंजय तळोले, तृप्ती डावखर, प्रकाश चव्हाण, जयश्री गायकवाड, सुनिता खर्डे यांनी मार्गदर्शन केले असून सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी अभिनंदन केला आहे.