अहिल्यानगरात भरदिवसा गँगवॉर; तरुणावर कोयता-रॉडने जीवघेणा हल्ला, गोळीबाराचीही चर्चा

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा झालेल्या गँगवॉरमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रे आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. स्थानिकांकडून गोळीबार झाल्याचाही दावा करण्यात येत असून, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णवाद नगर परिसरातील चौकात शुभम यादव (वय १९) हा जात असताना दोन ते तीन […]

अधिक वाचा..

किरकोळ वादातून शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला; खांदा फ्रॅक्चर

शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना कवठे यमाई हद्दीतील इचकेवाडी येथे घडली आहे. याबाबत कवठे यमाई (ता. शिरूर) येथील रहिवासी सुहास अनिल इचके (वय ३५, व्यवसाय-शेती) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ३१ […]

अधिक वाचा..

पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पतीविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): पोटगीच्या वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शिरूर शहरात घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चित्रा विक्रम टोणगे (वय ३२, व्यवसाय घरकाम, मूळ रा. कोहकडी ता. पारनेर जि. अहिल्यानगर, सध्या रा. फाकटे ता. शिरूर जि. पुणे) यांनी […]

अधिक वाचा..

ब्रेकअपच्या रागातून सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून बहिणीची ४० वार करून हत्या; आईवरही प्राणघातक हल्ला

मुरादाबाद (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या सख्ख्या बहिणीची चाकूने तब्बल ४० वेळा वार करून निर्घृण हत्या केली असून आईवरही प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक मल्होत्रा नावाच्या तरुणाने आपली जुळी बहीण हिमशिखा मल्होत्रा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भीषण अपघात! निमोणे येथील काळे कुटुंबावर मध्यरात्री काळाचा घाला

न्हावरे (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमोणे गावावर मध्यरात्री दुःखाचा डोंगर कोसळला असुन न्हावरे चौफुला रोडवरील नलगे वस्ती दरम्यान झालेल्या भीषण अपघातात काळे कुटुंबातील दोघांचा तर त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला असुन एक जण गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. या दुर्घटनेमुळे निमोणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास […]

अधिक वाचा..

वाहतूक पोलिसावर जीवघेणा हल्ला! वर्दी फाडून बेदम मारहाण, तिघांविरोधात गुन्हा दाखल

कल्याण: कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर भर चौकात कारमधील त्रिकुटाने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात घडली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हल्लेखोरांनी पोलिसाची वर्दी फाडून बेदम मारहाण केल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात विलास सुरेश भागीत (वय 33) हे वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कल्याणमधील फोर्टीस […]

अधिक वाचा..

निकालानंतर शहरात तणाव! भाजपच्या विजयी उमेदवारावर हल्ल्याचा आरोप

नाशिक: नाशिक महापालिका निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील वातावरण तापल्याचे चित्र आहे. नाशिकरोड परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपचे विजयी उमेदवार शरद मोरे यांच्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शरद मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी त्यांना कानशिलात लगावत मारहाण केली. या घटनेदरम्यान मारहाण करण्यासाठी आलेल्या एका […]

अधिक वाचा..

शिरूर! इन्स्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या रागातून युवकावर जीवघेणा हल्ला; पाहा Video

शिरूर (अरुणकुमार मोटे): फक्त इन्स्टाग्रामवर पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या कारणावरून शिरूर तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणावर चार जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ३० सप्टेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास डोंगरगण फाटा, हॉटेल स्वरा येथे घडली.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) […]

अधिक वाचा..

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणा-या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर गुंडांकडून झालेला अमानुष हल्ला हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार आहे. जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करून करण्यात आलेली ही मारहाण म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा थेट हल्ला आहे, सरकारने या हल्लेखोर गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..

इन्स्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या रागातून तरुणावर हॉटेलमध्ये जीवघेणा हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): फक्त इन्स्टाग्रामवर पाठविलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या कारणावरून शिरूर तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणावर चार जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ३० सप्टेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास डोंगरगण फाटा, हॉटेल स्वरा येथे घडली. फिर्यादी रोहन मळीभाऊ खामकर (वय २१, व्यवसाय- वेल्डिंग, रा. शिनगारवाडी म्हसे बु.) याने शिरूर […]

अधिक वाचा..